Anna Hazare : “उशिरा सुचलेलं शहाणपण..”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया-anna hazare reaction on arvind kejriwal resignation statement say belated wisdom ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anna Hazare : “उशिरा सुचलेलं शहाणपण..”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Anna Hazare : “उशिरा सुचलेलं शहाणपण..”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Sep 15, 2024 09:30 PM IST

Anna Hazare on Arvind Kejriwal : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, केजरीवाल यांना राजकारणात जाण्यास मी मनाई केली होती. मी त्यांना आधीच म्हटलं होतं की राजकारणात नका जाऊ

केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया
केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Anna Hazare on Arvind Kejriwal : कथिच दिल्ली दारू धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने १७७ दिवसानंतर केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर आहे आहेत. आज त्यांना कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याबाबत भाष्य केले. यावर त्यांचे एकेकाळचे गुरु अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवालांचं (Arvind Kejriwal) राजीनामा देण्याबाबतच भाष्य म्हणजे उशिराने सुचलेलं शहाणपण असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलं. यावर अण्णा हजारे म्हणाले की, आपण केजरीवाल यांना सुरुवातीपासून समाजसेवा करा, खूप पुढे जाल असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी तो ऐकला नाही आणि शेवटी त्यांना या परिस्थितीला सामोरे जावं लागलं. आता त्यांना याची जाणीव झाल्याचं हजारे म्हणाले आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) म्हणाले की, केजरीवाल यांना राजकारणात जाण्यास मी मनाई केली होती. मी त्यांना आधीच म्हटलं होतं की राजकारणात नका जाऊ. समाज सेवा करा. जनतेची सेवा करून खूप मोठे व्हाल. समाजसेवेतूनच खरा आनंद प्राप्त होतो. परंतु, त्यांनी माझं ऐकलं नाही, त्यांना तेव्हा माझ्या गोष्टी कदाचित पटल्या नसतील. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी काल म्हटलं होतं की, आपली ताकद १०० पटींनी वाढली आहे. त्यांनी ज पुन्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी म्हटले की, येत्या दोन दिवसात आपण नायब राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहे. माता सीता जेव्हा वनवासातून परतली तेव्हा तिला अग्नीपरीक्षेला सामोरे जावे लागले. मी आज अग्नीपरीक्षा देतोय.

दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. मात्र माझी मागणी आहे की, ही निवडणूक महाराष्ट्र विधानसभेसोबत नोव्हेंबर महिन्यातच घ्यावी. जनतेचा निर्णय येईपर्यंत मी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही. आता जनतेने पुन्हा कौल दिल्यानंतरच मी आणि मनिष सिसोदिया आपल्या पदांची जबाबदारी स्वीकारु, अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली.

Whats_app_banner