Moonitor Lizard life saved in Bhiwandi : भिवंडी येथे एका कार्यालयातील स्वच्छतागृहात एका घोरपडीने आपले घर वसवले होते. ही बाब कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी या संदर्भात माहिती वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनला (डब्लूडब्लूए) माहिती दिली. यानंतर या घोरपडीचे रेस्क्यू मिशन राबवण्यात आले. या घोरपडीला तिच्या अंड्यांसंहित सुखरूप वाचवण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
भिवंडी येथील सोनवले एका कार्यालयात आढळलेल्या घोरपडीचा तिच्या अंड्यांसमवेत बचाव करण्यात आला आहे. सध्या घोरपडीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ही घोरपड कार्यालयात बरेच दिवसांपासून वावरत होती. ही बाब कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली होती. या घोरपडीचा त्यांनी शोध घेतला मात्र, ती सापडली नाही.
दरम्यान, ही घोरपड त्यांना कार्यालयातील स्वच्छतागृहात जातांना दिसली. यामुळे कर्मचाऱ्यांनी तातडीने स्वच्छतागृहातील दार बाहेरून बंद केले. या घोरपडीला कसे वाचवायचे याची माहिती कर्मचाऱ्यांना नव्हती. त्यामुळे बराच वेळ ही घोरपड स्वच्छतागृहात बंद होती. जवळपास पूर्ण रात्र, घोरपड स्वच्छतागृहाच्या अंत होती. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांनी ही बाब वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनला (डब्लूडब्लूए) दिली.
बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्वच्छतागृहात अडकून पडलेल्या घोरपडीला बाहेर काढले. यावेळी या घोरपडीने अंडी दिले असल्याचे आढळले. बचाव पथकाने ही अंडी देखील सुखरूप काढली. दरम्यान, स्वच्छतागृहातून बाहेर पाडण्यासाठी या घोरपडीने अनेक प्रयत्न केले होते. त्यामुळे ती थकून बेशुद्ध अवस्थेत होती. ही बाब बचाव पथकाच्या लक्षात आली. त्यांनी तिला तातडीने वैद्यकीय उपचार दिले. त्यामुळे या घरोपडीचे प्राण वाचले आहे. सध्या ही घोरपड व तिची अंडी ही वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या ताब्यात आहेत. तिच्यावर उपचार सुरू आहेत. एखादा प्राणी, पक्षी, जंगली जनावर जखमी अथवा अडचणीत दिसल्यास तातडीने बाब वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनला माहिती द्यावी असे आवाहन संस्थेने केले आहे.
संबंधित बातम्या