Anil Parab Sai Resort Demolition: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांना खेड जिल्हा सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. त्यांचे दापोली येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश खेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे रिसॉट अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा आरोप करत ते ते बांधतांना सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने जप्तीची कारवाई केली होती.
दापोली येथील साई रिसॉट हे नियमांचे भंग करून बांधल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. याची दखल घेत ईडीने अधि मनी लॉंड्रिंग प्रकरणी या रिसॉर्टवर कारवाई करत हा बंगला तात्पुरत्या स्वरूपात जप्त केला होता. दरम्यान, ईडीने हायकोर्टात या प्रकरणी आरोपपत्र देखील सादर केले आहे.
किरीट सोमय्या यांनी आरोप करत हे रिसॉर्टचे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप केला केला होता. तसेच या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा देखील आरोप करण्यात आला होता. दरम्यान, हे रिसॉट अनिल परब यांच्या मालकीचे असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती. तब्बल दीड ते दोन वर्ष त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानंतर ईडीने कारवाई केली होती. दरम्यान, आमदार अनिल परब यांनी सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. या रिसॉटशी काही संबंध नसल्याचे देखील परब म्हणाले होते.
या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. साई रिसॉट हे परब यांचे जवळचे समजले जाणारे सदानंद कदम यांच्या मालकीचे आहे. सध्या अनिल परब यांना या प्रकरणी हायकोर्टाने दिलासा देत अटकेपासून संरक्षण दिले आहे. तर त्यांचे निकटवर्ती सदानंद कदम यांना अटक करण्यात आली. ईडीने या प्रकरणी १०.२० कोटी रुपये किंमतीचे हे रिसॉट तात्पुरत्या स्वरूपात जप्त केले होते. यात २ कोटी ७३ लाख ९१ हजार रुपये किमतीची ४२ गुंठे जमीन व ७ कोटी ४६ लाख ४७ हजार रुपये किमतीचे रिसॉर्ट वर जप्तीची कारवाई करण्यात आली होती.
संबंधित बातम्या