आरोप-प्रत्यारोपांचा वाद चिघळणार! अनिल देशमुख यांचं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आरोप-प्रत्यारोपांचा वाद चिघळणार! अनिल देशमुख यांचं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान

आरोप-प्रत्यारोपांचा वाद चिघळणार! अनिल देशमुख यांचं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान

Updated Jul 25, 2024 02:29 PM IST

anil deshmukh dares devendra fadnavis : माझ्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जे काही पुरावे असतील ते त्यांनी जाहीर करूनच टाकावेत, असं आव्हान अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मी काय बोललो ते जाहीर कराच! अनिल देशमुख यांचं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मी काय बोललो ते जाहीर कराच! अनिल देशमुख यांचं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis : ‘शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मी खासगीत काय बोलले होतो त्याचे व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावेत,’ असं आव्हान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

ते एएनआयशी बोलत होते. मागील दोन दिवसांपासून अनिल देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याची सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून झाली. मानव यांनी त्या पत्रकार परिषदेत देशमुख यांच्या चुकीच्या अटकेवरही भाष्य केलं होतं.

अनिल देशमुख यांनी मानव यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी एका माणसाच्या करवी मला ऑफर दिली होती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार व अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करण्यास सांगितलं होतं. त्या बदल्यात ईडीच्या अटकेपासून संरक्षण देऊ असं सांगितलं होतं. मात्र, हे खोटं काम करण्यास स्पष्ट नकार दिला आणि जेलमध्ये जाणं पसंत केलं. फडणवीसांनी पाठवलेला माणूस कोण होता व त्यांनी काय प्रतिज्ञापत्रं दिली होती, या सगळ्याचे पुरावेही माझ्याकडं आहेत, असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. देशमुख यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

फडणवीसांनी काय दिलं होतं उत्तर?

फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. उलट, अनिल देशमुख यांच्याच विरोधात माझ्याकडं काही व्हिडिओ आहेत. त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी ते मला आणून दिले आहेत. त्यात ते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय-काय बोलले आहेत ते सगळं आहे. वेळ आल्यास मी ते जाहीर करेन, असं फडणवीस म्हणाले होते. मी कुणाच्या नादी लागत नाही, पण कुणी माझ्या नादाला लागलं तर सोडतही नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.

अनिल देशमुख यांनी दाखवला पेन ड्राइव्ह

फडणवीसांच्या या इशाऱ्याला फार महत्त्व देत नसल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. 'मी शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोललो याचे पुरावे असतील तर त्यांनी उघड करावेत. लोकांसमोर आणावेत, असं माझं जाहीर आव्हान आहे, असं देशमुख म्हणाले. त्याचवेळी, देशमुख यांनी फडणवीस यांच्या विरोधातील पुराव्यांचा पेन ड्राइव्ह देखील दाखवला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या