Badlapur School student sexual assault case: कोलकाता येथील बलात्कार व खून प्रकरणी देशात आंदोलने सुरू असतांना बदलापूर येथील एका मोठ्या शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पालक संतप्त आझाले असून त्यांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. संतप्त पालकांनी व आंदोलकांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल्वे रुळावर उभे राहून घोषणा देऊन आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे या मार्गावरची सेवा ठप्प झाली आहे.
बदलापूर येथील एका मोठ्या शाळेत दोन मुलींवर सफाई कामगाराने लैंगिग अत्याचक्र केले. ही घटना उघडकीस आल्यावर पालक आणि नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. काही पालकांनी शाळेवर मोर्चा काढला तर काही पालकांनी आज बदलापूर रेल्वे पालकांनी सकाळी दहा वाजता रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
आज सकाळी मोठ्या प्रमाणात आंदोलक हे बदलापूर रेल्वे स्थानकावर जमा झाले होते. अनेकांच्या हातात फलक होते. आंदोलकांनी रुळावर येत रेल रोको आंदोलन सुरू केले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी अत्याचार प्रकरणातील पीडितांना न्याय देण्याची मागणी करत, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपीला फाशी द्या अशी घोषणाबाजी देखील आंदोलकांनी केली. सुरवातीला आंदोलक पालक हे शाळेच्या पुढे जमले होते. सकाळी साडेसहा वाजता सर्व पालकांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर संतप्त झालेल्या आंदोलक पालकांनी थेट बदलापूर रेल्वे स्थानकात जात रेल्वे रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे डाऊन मार्गावरील कोयना एक्सप्रेससह संतप्त आंदोलकांनी रोखून धरली होती.
पालकांचा मोठा गट रेल्वे रुळावर आल्याने रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. सध्या पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात असून रेल्वे सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान शाळा प्रशासनाने एक माफीनामा प्रसिद्ध केला आहे. मुलींवर अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्यात आला असून पालकांची शानेने माफी मागितली आहे. तसेच हा प्रकार दुर्दैवी, घृणास्पद व निंदनीय असल्याचं देखील शाळेने म्हटलं आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी या साठी आग्रही असल्याचं देखील म्हटलं आहे.