Viral News : कोलोरॅडोमध्ये एका तरुणीला प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. हत्येचे कारण देखील धक्कादायक आहे. प्रियकराने प्रेयसीने इंटरव्ह्यू चांगला दिला नाही म्हणून टीची मज्जा उडवली. यामुळे संतापलेल्या प्रेयसीने सुपारी देऊन त्याची हत्या केली. आरोपी हा तरुणीला बस प्रवासात भेटला होता. यावेळी तिने त्याला प्रियकराला मारण्याची सुपारी दिली.
अॅश्ले व्हाईट असे या २९ वर्षीय तरुणीचे नाव आहे. तर कोडी डेलिसा असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकरांचे नाव आहे. अॅश्लेला तिच्या प्रियकरांची हत्या केल्याच्या आरोपा खाली दोषी ठरवण्यात आले होते. डेलिसाने व्हाईटची खिल्ली उडवत म्हटले होते की, "तुला चांगली नोकरी मिळेल की नाही ही शंका आहे.' त्यामुळे अॅश्लेला राग आला होता. या रागाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचे तिने कोर्टापुढे सांगितले.
अॅश्ले व्हाईट ही नोकरीच्या शोधात होती. ती गेल्या काही दिवसांपासून विविध कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देत होती. अशाच एका नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी ती डेन्व्हरला गेली होती. दरम्यान, दोघांच्या नात्याला २०२० मध्ये वाईट वळण लागलं. खरं तर, व्हाईट ही इंटरव्ह्यू देऊन घरी बसने जात होती. यावेळी तिने इंटरव्ह्यूबाबत डेलिसाला सांगण्यासाठी मेसेज केला. या चॅटदरम्यान डेलिसाने अॅश्ले व्हाईटला नोकरी मिळण्याच्या शक्यतेबद्दल शंका व्यक्त करत तिची मज्जा उडवली. व्हाईटला याचं खूप वाईट वाटलं. तसेच तिला वाईट देखील वाटलं. यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. बस प्रवासात ती एका अनोळखी व्यक्तीला भेटली. दोघांनी बोलायला सुरुवात केली. त्याने स्वत:ची ओळख आरोपी तरुणीला 'स्कॉट' अशी करून दिली.
स्कॉटने व्हाईटला अनेक गोष्टी विचारल्या. तिचे एखाद्या पुरुषासोबत प्रेमसंबंध आहेत का ? हे त्याला जाणून घ्यायचे होते. त्याने तिला तिच्यावर कुणी बलात्कार केला का असे विचारले. व्हाईटने त्याला होकारार्थी उत्तर दिले. हे ऐकून स्कॉट म्हणाला की, अशा व्यक्तीला मारून टाकावे. यानंतर दोघेही डेलीसाच्या घरी गेले. अनोळखी व्यक्तीने तो टेक्सास येथे राहत असून तो अॅश्ले व्हाईटचा भाऊ असल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्याच्या जवळची बंदूक काढून डेलीसाच्या डोक्यात त्याने दोन गोळ्या झाडल्या. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा तपास केला, तसेक दोन्ही आरोपींना अटक केली. यावेळी अॅश्ले व्हाईटने तिने प्रियकर डेलीसाची हत्या का केली याचे खरे कारण सांगितले. यामुळे पोलिस देखील चक्रावले.
संबंधित बातम्या