Good news: मुंबईत बीएमसीच्या कूपर रुग्णालयात 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रियेचा श्रीगणेशा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Good news: मुंबईत बीएमसीच्या कूपर रुग्णालयात 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रियेचा श्रीगणेशा

Good news: मुंबईत बीएमसीच्या कूपर रुग्णालयात 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रियेचा श्रीगणेशा

HT Marathi Desk HT Marathi
Updated Dec 26, 2022 09:51 PM IST

मुंबई महानगरपालिकेद्वारे संचालित विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियांना आजपासून सुरुवात झाली आहे. Angioplasty operation facility opened in BMC run Cooper hospital

Angioplasty operation facility opened in BMC run Cooper hospital
Angioplasty operation facility opened in BMC run Cooper hospital

मुंबई महानगरपालिकेद्वारे संचालित विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियांना आजपासून सुरुवात झाली आहे. आज, २७ डिसेंबर रोजी पहिल्याच दिवशी एकूण तीन रुग्णांवर अँजिओप्लास्टी यशस्वीपणे पार पडली आहे. कूपर रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया सुरु झाल्याने मुंबईत पश्चिम उपनगरांमधील रुग्णांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

मुंबईत विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये फेब्रुवारी २०२२ मध्‍ये हृदयरोग विभाग सुरु करण्यात आला. परंतु येथे हृदयरोग शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध झाली नव्हती. महानगरपालिकेच्या परळ स्थित केईएम रुग्‍णालयाचे हृदयरोगविभाग प्रमुख डॉ. अजय महाजन यांनी हृदयरोग शस्त्रक्रिया सुविधा सुरु करण्‍यासाठी महत्त्वाचे सहकार्य पुरवले आहे. महानगरपालिकेचे परळ येथील केईएम रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर रुग्‍णालय या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपलब्‍ध असणार्‍या सुविधांच्‍या धर्तीवर अँजिओप्लास्टीसारखी सुविधा देणारे कूपर रुग्‍णालय आता पश्चिम उपनगरातील महानगरपालिकेचे पहिलेच रुग्‍णालय ठरले आहे.

हृदयरोगांनी त्रस्‍त असणा-या रुग्‍णांसाठी अँजिओप्लास्टी सारखी सुविधा सुरु केल्‍यामुळे रुग्‍णांना वेळीच उपचार मिळून त्‍याचा लाभ घेता येणार आहे.

आज करण्यात आलेल्या तीनही अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया या राज्य सरकारच्या महात्‍मा ज्‍योतिबा फुले जनआरोग्‍य योजने अंतर्गत करण्यात आल्या. त्यामुळे अँजिओप्लास्टी पार पडलेल्या तीनही रुग्णांवरील अँजिओप्लास्टी व स्‍टेन्‍टसाठी येणारा संपूर्ण खर्च शासनाच्‍या महात्‍मा ज्‍योतिबा फुले जनआरोग्‍य योजने अंतर्गत विनामूल्य करण्‍यात आला आहे. कूपर रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्‍णांना खर्चाचा भार सोसावा लागणार नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर