Anganwadi Sevika Recruitment: महिला व बालविकास विभागाने मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १८ हजार ८८२ पदे भरली जाणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेसाठी ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका व १२ हजार २४३ अंगणवाडी मदतनीस असे एकूण १८ हजार ८८२ पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी बेरोजगारांना तयारी कारवाई लागणार आहे. या पदासाठी नेमका अर्ज कसा करावा ? तसेच यासाठी कोणती कागदपत्र लागतात असे अनेक प्रश्न तरुणांच्या मनात आहेत. या प्रश्नांची माहिती घेऊयात.
महिला आणि बालकल्याण विभागाने ही भरती स्थानिक पातळीवर राबवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यात प्रामुख्याने अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदांची भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत ही पदभरती केली जाणार आहे. या बाबतच्या जाहीरतात देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. १४ ते २ मार्च या काळात या साठी अर्ज करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने राबवली जाणार आहे. या साठी अर्ज करतांना काही महत्वाची कागदपत्र जोडावे लागणार आहेत. तसेच ही सर्व कागदपत्र साक्षांकीत करावी लागणार आहे. अर्ज करतांना उमेदवारांना तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. या सोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. तसेच जातीचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी ही अट लागू नाही.
जर उमेदवार महिला असेल आणि ती विधवा असेल तर तिला देखील विधवा असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. जर उमेदवार अनाथ असेल तर त्याला शासकीय किंवा अनुदानित अस्लयाबाबतचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. या पदासाठी अर्ज करतांना शैक्षणिक कागदपत्र जोडणे गरजेचे आहे. यात शैक्षणिक अहर्ता, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रक जोडणे गरजेचे आहे. या दोन्ही पदासाठी किमान १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
जर उमेदवार हा पदवी किंवा पदव्युत्तर झाला असील तर या सर्वांचे सत्यप्रत अर्जाला जोडणे गरजेचे आहे. जर उमेदवार डी. एड किंवा बी. एड असल्यास ते उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देखील जोडणे गरजेचे आहे. उमेदवाराणे एमएससीआयटी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच त्या बाबतचे प्रमानपत्रं देखील त्याने जोडणे गरजेचे आहे. या सोबत आधार कार्ड आणि अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस म्हणून किमान २ वर्ष अनुभव असल्याचे प्रमाणपत्र देखील उमेदवारांना जोडावे लागणार आहे. ही कागदपत्र पूर्ण असल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.
संबंधित बातम्या