मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andheri by poll election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ३१.७४ टक्के मतदान, आता निकालाकडे लक्ष

Andheri by poll election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ३१.७४ टक्के मतदान, आता निकालाकडे लक्ष

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 03, 2022 10:17 PM IST

Andheri by poll election :विधानसभेच्या'१६६ - अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ३१.७४ नोंदवली गेली.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ३१.७४ टक्के मतदान
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ३१.७४ टक्के मतदान

Andheri by poll election : निवडणूक आयोगाने जाहीर केल्यापासून चर्चेत असलेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ३१.७४ नोंदवली गेली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी आज दिली.

अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेदिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नीऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली होती. लटकेंविरोधात भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली, तरी ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार होते.

अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के; सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले. तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस अर्थात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दिली. निवडणुकीचा निकाल रविवारी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या