मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धीरेंद्र महाराजांना आव्हान देणाऱ्या प्रा. श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमात जोरदार राडा

धीरेंद्र महाराजांना आव्हान देणाऱ्या प्रा. श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमात जोरदार राडा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 18, 2023 10:22 PM IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमात काही तरुणांना गोंधळ घातला. धीरेंद्र कृष्ण महाराज यांची कोणतीही पोलखोल न करता या कार्यक्रमात हिंदू धर्माची बदनामी केल्याचा आरोप केला जात आहे.

प्रा. श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमात जोरदार राडा
प्रा. श्याम मानव यांच्या नागपुरातील कार्यक्रमात जोरदार राडा

नागपूर- धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल करण्यासाठी नागपुरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याच्या कार्यक्रमात काही तरुणांनी गोंधळ घातला व त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अंनिसकडून आजच्या सभेच्या माध्यमातून त्यांनी कुठेही धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल केली नाही. आजच्या सभेत त्यांनी फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप काही तरुणांनी करत श्याम मानव यांची सभा संपताच उभे राहून गोंधळ घातला. 

श्याम मानव फक्त हिंदू धर्माच्या विरोधात बोलून हिंदू धर्माला बदनाम करत आहेत. असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून श्याम मानव यांची आज नागपुरात सभा आयोजित केली होती. यावेळी श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांपूर्वी नागपुरात धीरेंद्र कृष्ण महाराज यांची राम कथा आणि दिव्य दरबार सुरू झाले होते. या दिव्य दरबाराच्या माध्यमातून धीरेंद्र कृष्ण महाराज अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप अंनिसने केला आहे. अंनिसने  धीरेंद्र कृष्ण महाराज यांना आव्हान दिले होते की, दिव्य शक्ती सिद्ध करा आणि ३० लाख रुपये बक्षीस मिळवा. मात्र धीरेंद्र कृष्ण महाराज अंनिसचे आव्हान न स्वीकारताच नागपुरातून परत गेले होते.  

धीरेंद्र कृष्ण महाराज लोकांचे भविष्य सांगण्याठी प्रत्येकी एक हजार रूपये घेत असून त्याचे पुरावे अंनिसकडे असून याबाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अंनिसने केली होती. एक हजार रुपये देण्यासाठी लोकांना बँक खाते नंबरही दिला असल्याचा अंनिसचा आरोप असून हे कृत्य राज्यातील जादू टोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन असल्याने धीरेंद्र कृष्ण महाराज व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी अंनिसने मागणी केली होती. 

IPL_Entry_Point

विभाग