मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सर्वसामान्यांच्या आनंदात भर! शिवजयंती व राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानंही मिळणार ‘आनंदाचा शिधा’

सर्वसामान्यांच्या आनंदात भर! शिवजयंती व राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानंही मिळणार ‘आनंदाचा शिधा’

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 10, 2024 03:19 PM IST

Maharashtra Cabinet Decision on Anandacha Shidha : सण-उत्सवाच्या निमित्तानं रेशनकार्ड धारकांना दिला जाणारा आनंदाचा शिधा आता आणखी दोन दिवशी मिळणार आहे.

Anandacha Shidha
Anandacha Shidha

Anandacha Shidha on Shiv Jayanti : अयोध्येतील राम मंदिरात होणारा प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा व शिवजयंती या दोन उत्सवांच्या निमित्तानं राज्यातील शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याच बैठकीत रेशनकार्ड धारकांना ही खूशखबर देण्यात आली.

Shiv Sena MLA Disqualification Live : १६ आमदारांना अपात्र ठरवणं ही खायची गोष्ट आहे का?; शिंदे गटाच्या आमदाराचा सवाल

राज्य सरकारच्या वतीनं गुढी पाडवा, गणेशोत्सव व दिवाळी अशा सणांनिमित्त रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जातो. यात एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर, एक किलो तेल, पोहा आणि मैदा याचा समावेश असतो. अवघ्या शंभर रुपयांत या जिन्नस गरजूंना दिल्या जातात. आता हा शिधा आणखी दोन दिवस दिला जाणार आहे. अर्थात, राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं मिळणारा शिधा हा प्रत्येक वर्षी मिळेल का हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतर निर्णय पुढीलप्रमाणे…

 

> 'सत्यशोधक' या मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट देण्याच्या निर्णयास मंजुरी

> राज्यातील न्यायालयांतील अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ पदे तसेच त्यांचेसाठी सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्याबाबत व ५८०३ बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याबाबत निर्णय

> राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.

> ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मंजुरी

Sanjay Raut : निकाल आधीच फिक्स झालाय; कसा ते संजय राऊत यांनी सांगितलं!

> विरार येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी

> पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान रु. ५० हजारांवरून एक लाख रुपये करण्यास मान्यता

> महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात मदत दिली जाणार

 

WhatsApp channel