मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पत्नीचे अनैतिक संबंध; पतीची गळफास घेऊन आत्महत्या, ९ जणांवर गुन्हा

Pune Crime : पत्नीचे अनैतिक संबंध; पतीची गळफास घेऊन आत्महत्या, ९ जणांवर गुन्हा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 27, 2022 11:11 AM IST

पत्नीचे अनैतिक संबंधावरुन पती मानसिक तणावाखाली होता. या तणावामुळे त्यानं टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला.

Pune Crime
Pune Crime (HT_PRINT)

Pune crime सासरच्या मंडळींनी संगनमत करून पतीशी भांडणे करणे त्याला त्याच्या पत्नीचे दुस-याशी संबंध आहे असे सांगत मानसिक तणाव दिला. या तनावातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोहिनूर शिंदे (रा. दत्तनगर, पिंपरी सांडस, हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शिंदे याचे वडील हिरू पांडू शिंदे (वय ५४, रा, दत्तनगर, पिंपरी सांडस, हवेली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २०२१ ते १ जून ते २०२२ दरम्यान, घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोहिनुर शिंदे याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचे लग्न झाल्यापासून सासरची मंडळी कोहिनूरला त्रास देत होते. सासरची मंडळी कोहिनूरला वारंवार त्रास देत होते. सर्वांनी संगनमत करून त्याला अनेक गोष्टी सांगितल्या. एवढेच नाही तर त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे सायबू शिंदे याने सांगितले. दरम्यान, या गोष्टीमुळे कोहिनुर हा मानसिक तणावाखाली होता. अखेर त्याने आपले जिवन संपवण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी सासरच्या ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग