Pune Aircraft Accident : पुणे विमानतळावर सुखोई विमानाचे टायर फुटल्याने किरकोळ अपघात यापूर्वी झाले आहे. मात्र, आज मोठी दुर्घटना या विमानतळावर टळली आहे. पुणे ते दिल्ली या एयर इंडियाच्या विमानाला 'पुश बॅक टग' ट्रकची धडक धडक बसल्याने या विमानाला मोठे भगदाड पडले. सुदैवाने ही बाब लक्षात आल्याने या विमानाचे उड्डाण रोखण्यात आले. यामुळे मोठा अपघात टळला आहे. विमानाचे उड्डाण रद्द झाल्याने प्रवाशांचे मात्र, हाल झाले.
पुणे विमानतळाहून अनेक रस्त्रीय विमानांचे उड्डाण होते. रोज २०० ते ३०० विमानांचे संचलन या विमानतळावूरून होते. आज देखील एयर इंडियाचे पुणे ते दिल्ली या विमानाचे उड्डाण होणार होते. मात्र, या विमानाला टर्मिंनलला लावण्यासाठी 'पुश बॅक टग' ट्रक जोडला जातो. या ट्रकची धडक या विमानाला बसल्याने एयर इंडियाच्या या विमानाच्या खालच्या बाजूला मोठे भगदाड पडले. या धडकेत 'फ्युजलॉज' आणि विमानाच्या पुढच्या टायरचे व पंखाच्या पत्र्याचे देखील मोठे नुकसान झाले. त्यामुळे एअर इंडियाला हे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही बाब लक्षात आली नसती तर या विमानाचा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. दरम्यान, या घटनेमुळे पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
पुणे विमानतळावरून एअर इंडिया फ्लाइट क्रमांक एआय ८५८ ही गुरुवारी दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी दिल्लीसाठी उड्डाण घेणार होते. यावेळी ऐरोब्रिजला जोडलेले विमान प्रवासी बसल्यावर बाजूला झाले. दरम्यान, यावेळी या विमानाच्या पुढच्या खालील बाजूला धडक बसली. ही धडक जोरदार बसल्याने यात विमानाचा पत्रा तुटून मोठे भगदाड पडले. या विमानात सुमारे १६० प्रवासी होते. हे विमान पुण्याहून दिल्लीला जाणार होते. हे विमान टॅक्सी ट्रॅकवरून धावपट्टीवर जात होते. मात्र, त्या आधी हा अपघात झाला. या अपघातानंतर मोठा आवाज झाला. पायलटने विमान थांबवून विमानाची पाहणी केली. त्यांना पुढच्या बाजूला मोठे भगदाड दिसल्याने त्यांनी या विमानाचे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली.
संबंधित बातम्या