मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident: शाळेत चाललेल्या माय- लेकाचा भीषण अपघात, आईसमोरच मुलाचा मृत्यू
मृत अथर्व
मृत अथर्व

Pune Accident: शाळेत चाललेल्या माय- लेकाचा भीषण अपघात, आईसमोरच मुलाचा मृत्यू

24 November 2022, 18:30 ISTNinad Vijayrao Deshmukh

Pune Accident: पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे एका आई समोर तिच्या चिमूकल्याचा मृत्यू झाला. मुलाला शाळेत सोडत असताना हा अपघात झाला.

पिंपरी : पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे मुलाला स्कूटीवरून शाळेत सोडण्यासाठी जात असतांना मोटारीने धडक दिल्याने चिमूकल्याचा त्याच्या आई समोरच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हळ हळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अथर्व रवींद्र आळणे (वय ११) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व हा चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावी (ब) मध्ये शिकत होता. गुरुवारी त्याची आई हर्षदा ही त्याला घेऊन स्कुटीने शाळेत सोडवण्यासाठी जात होती. यावेळी जुन्या आरटीओ जवळ शाहूनगरच्या कॉर्नर जवळ एका भरधाव मोटारीने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. यात धडकेमुळे स्कुटीवरून अथर्व खाली पडला.

यावेळी त्यांच्या जवळून जाणाऱ्या मालवाहू भरधाव ट्रक खाली अर्थव आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर हर्षदा या दुसऱ्या बाजूला पडल्याने त्या किरकोळ जखमी आहेत. मुलाचा समोरच मृत्यू झाल्याचे पाहून हर्षदा जीवाच्या आकांताने त्या मोठं- मोठ्याने रडत होत्या. त्यांना पाहून सर्वांनी हळ हळ व्यक्त केली. या प्रकरणी ट्रकचालक आणि चारचाकी चालकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड येथे मोठ्या प्रमाणात ट्राफिक वाढले आहे. वाहतूक कोंडीतही भरधाव वेगाने आणि नियमाची पायमल्ली करून वाहने चालवली जातात. याचा फटका मात्र, सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. यामुळे अपघात होऊन निर्दोष आणि वाहतूक नियम पळणाऱ्यांच्या जीववर बेतत आहे.

 

विभाग