Amravati: विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले; लग्नाला नकार देताच तरुणाचे धक्कादायक पाऊल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati: विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले; लग्नाला नकार देताच तरुणाचे धक्कादायक पाऊल

Amravati: विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले; लग्नाला नकार देताच तरुणाचे धक्कादायक पाऊल

Aug 29, 2023 12:55 PM IST

Amravati Suicide:विवाहित प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

Death (Representative Image)
Death (Representative Image)

Azizpur youth Dies By Suicide: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात धक्कादायक घटना घडली. विवाहित महिलेच्या प्रेमात पडलेल्या तरुणाने तिच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र या महिलेने लग्नाला नकार देताच तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी मृतक तरुणाच्या आईने संबंधित महिलेविरोधात अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

श्याम नरेश खडके (वय, २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. श्याम हा अंजनगाव सुर्जी येथील अजिजपूर येथे वास्तव्यास होता. या परिसरातील एका विवाहित महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. यानंतर श्यामने संबंधित महिलेकडे लग्नासाठी तगादा लावला. परंतु, महिला विवाहित असल्याने तिने श्यामला लग्नास नकार दिला.

दरम्यान, श्यामने २५ ऑगस्ट २०२३ रोजी पुन्हा या महिलेला लग्नाची मागणी घातली. मात्र, ती नकारावर ठाम होती. यामुळे नैराश्यात गेलेल्या श्यामने रविवारी (२७ ऑगस्ट २०२३) वडाळी मार्गावरील शेतकरी नागोराव रावळे यांच्या शेतात जाऊन गळफास घेतला.

या घटनेची माहिती मिळताच अंजनगाव सुर्जी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी शामच्या आईकडे चौकशी केली असता अनैतिक संबंधातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणात श्यामच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित विवाहित महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर