Amravati Crime News Marathi : घराशेजारी राहणाऱ्या तरुणासोबत पत्नीचे अनैतिक संबंधांचा पतीने भांडाफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे ही घटना घडली आहे. त्यानंतर आता पीडित पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करत दोघांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पतीला पत्नीचे शेजारी राहणाऱ्या २० वर्षीय तरुणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्यानंतर पतीने संपूर्ण प्लॅन करत पती आणि तिच्या प्रियकराच्या कृत्याचा भांडाफोड केला आहे. त्यामुळं आता या धक्कादायक घटनेमुळं अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे राहणाऱ्या एका तरुणाच्या पत्नीचं शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळं पतीने तिच्या पत्नीवर नजर ठेवलेली होती. घटनेच्या दिवशी आरोपी पत्नीने प्रियकरासोबत व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम आणि मोबाईलच्या माध्यमातून चॅट केल्याचं पतीला समजलं होतं. त्यानंतर महिलेने पतीला एका खोलीत झोपवलं, त्यानंतर तिने बाहेरून दरवाजा लावून घेतला. त्यानंतर आरोपी महिलेने शेजारी राहणाऱ्या तरुणाला दुसऱ्या खोलीत बोलावून घेतलं. परंतु महिलेला पती खोलीत झोपण्याचं नाटक करत होता. बायको बाहेर गेल्याचं समजाताच त्याने दोरीच्या सहाय्याने दरवाजा उघडला. घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन पाहिलं असता बायको आरोपी तरुणासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळून आली.
पतीसमोर बिंग फुटल्याने आरोपी महिला हादरली. त्यानंतर आरोपी तरुणाने महिलेच्या पतीला धक्काबुक्की करत मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर महिलेनेही आपल्याच पतीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. प्रकरण वाढत असल्याचं समजताच आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर पीडित पतीने या घटनेची पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीची पत्नी आणि तिच्या आरोपी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर दोघांच्या अटकेची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या