मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati News : बळवंत वानखडे यांनी कुलूप तोडून घेतला कार्यालयाचा ताबा, यशोमती ठाकूर चंद्रकांत पाटलांशी भिडल्या, Video

Amravati News : बळवंत वानखडे यांनी कुलूप तोडून घेतला कार्यालयाचा ताबा, यशोमती ठाकूर चंद्रकांत पाटलांशी भिडल्या, Video

Jun 22, 2024 08:26 PM IST

Amravati News : अमरावतीत खासदार कार्यालयाचा वाद विकोपाला गेला असून आज आमदार यशोमती ठाकूर व खासदार वळवंत वानखेडे यांनी आक्रमक होत कार्यालयाचे कुटूप तोडून ताबा मिळवला.

बळवंत वानखडेंनी कुलूप तोडून घेतला कार्यालयाचा ताबा,
बळवंत वानखडेंनी कुलूप तोडून घेतला कार्यालयाचा ताबा,

अमरावतीत खासदार कार्यालयाचा वाद टोकाला पोहोचला आहे. यावरून आज जिल्हाधिकारी कार्यालयात हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसमोरच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, खासदार बळवंत वानखडेही (Balvant Wankhede) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसमोरच आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी आक्रमक भूमिका घेत शनिवारी (२२) जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय ताब्यात घेतले. प्रशासनाकडून दडपशाही व दिरंगाईचा आरोप करत खासदार कार्यालयाचे कुलूप तोडून काँग्रेसने कार्यालय ताब्यात घेतले.

अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासमोरच हा सर्व प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याचा आरोप करत खासदार बळवंत वानखडे व यशोमती ठाकूर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आम्ही संयम पाळणारे लोक आहोत. मात्र इथले पालकमंत्री, जिल्हाधिकारी प्रशासन काहीच ऐकायला तयार नाही. जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आहे. आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने खासदार बळवंत वानखडे, मी आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन व कार्यालयाचे कुलूप तोडूनआत प्रवेश केला. यावेळी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. या आधीचे सर्व खासदार हे कार्यालय वापरत होते. परंतु बळवंतभाऊ निवडून आल्यानंतर अनेकदा पत्रव्यवहार करुन देखील कार्यालयाचा ताबा देण्यात आला नाही.भाजपा सरकारची केवळ दादागिरी सुरु असून निवडणूक निकालानंतर प्रमाणपत्र द्यायला तीन तासांचा वेळ लावला हे सर्वश्रृत आहेच.

भाजपची ही दादागिरी आहे. ही आम्ही सहन करू शकत नाही. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडून आलो आहोत. आमच्या खासदाराचा देखील मान सन्मान झाला पाहिजे. आमच्या मतदारसंघात देखील लोकच राहतात. डीपीडीसीचा फंड हा टक्केवारी घेऊन वाटप केला जातो, असा आरोप करत या दडपशाही विरोधात आम्ही आवाज उचलला आणि आज खासदार कार्यालय ताब्यात घेतले, असेही त्या म्हणाल्या.

 

मागच्या वेळी खासदार निवडून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी खासदाराची पाटी लागली होती मात्र आज एवढे दिवस झाले पण अजूनही कार्यालयाचा ताबा दिलेला नाही ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही. गुन्हे दाखल करायचे तर करु दे पण कार्यालयाचा ताबा आम्ही घेणार म्हणजे घेणारच.

WhatsApp channel