navnit rana threat to kill : आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आरोपीने राणा यांना व्हॉटसअपवर एक क्लिप पाठवून त्यांना मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान देण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले आहे. या प्रकरणी राजापेठ पोलीस (Amravati Rajapeth Police) ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार नवनीत राणा या त्यांच्या बेधडक व्यक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहत असतात. दरम्यान, राणा यांना या पूर्वीही जीवे मारण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला अटक देखील केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्या सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय साहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. गेल्या महिन्यात राणा यांना धमकी देणाऱ्या श्याम तायवाडे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. तू गर्दीच्या ठिकाणी जातेस, त्या ठिकाणी तुझ्यावर कधी धारधार चाकूने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही अशी धमकी आरोपी तायवाडे यांनी दिली होती. आरोपीने, त्यांच्या आई वडिलांच्या नावावर असलेल्या सीम कार्डचा वापर करत राणा यांना अश्लील शिवीगाळ केली होती. पोलिसांनी नेरपिंगळाई येथून आरोपोळा अटक केली होती. दरम्यान, आता आलेला धमकीचा फोन हा पाकिस्तान किंवा अफगानीस्थानातून आल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.
दरम्यान, त्यांना धमकी देण्यामागे कुणाचा हात आहे यावर नवनीत राणा यांनी खुलासा केला आहे. या प्रकरणी एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. संसदेत हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्यामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे राणा यांनी म्हंटले आहे.