मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाचा दणका, वडील हरभजन सिंह फरार घोषित

Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाचा दणका, वडील हरभजन सिंह फरार घोषित

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 30, 2023 04:37 PM IST

Navneet Rana father harbhajan singh declared fugitive : जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह यांना शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फरार म्हणून घोषित केले आहे.

Navneet Rana
Navneet Rana

Shivdi Court on Navneet Rana : जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांना फरार म्हणून घोषित केले आहे. याशिवाय, हरभजन सिंह यांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेले प्रकरण दोन्हीही वेगवेगळे असल्याचं निरीक्षण शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नोंदवले आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हरभजन सिंह यांना एक महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधीत ते न्यायालयासमोर हजर न झाल्यास त्यांची प्रॉपर्टी जप्त होण्याची शक्यता आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला बनवून घेतला, असा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला. याप्रकरणी हरभजन सिंह यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नवनीत राणा आणि हरभजन सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवनीत राणा यांनी २०१३ मध्ये आमदार रवी राणा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं. परंतु, नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंह यांनी फसवणूक करून जातीचे प्रमाणपत्र मिळवले, असा आरोप शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केला. अडसूळ यांनी २०१७ मध्ये नवनीत राणा यांच्याविरोधात याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना कार्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले. याच जात प्रमाणपत्राच्या आधारावर नवनीत राणा यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळचा पराभव केला.

WhatsApp channel