मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Accident : महामार्गावरील खड्डा चुकवण्याच्या नादात दोन ट्रकची धडक; चार ठार
अपघातग्रस्त ट्रक
अपघातग्रस्त ट्रक
05 August 2022, 17:53 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
05 August 2022, 17:53 IST
  • Truck accident in Amravati अमरावती येथे अपघातांचे सत्र सुरूच आहे. नागपूर औरंगाबाद मार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला

अमरावती: अमरावती येथे नागपूर-औरंगाबाद मार्गावरील खड्डा चुकवण्याच्या नादात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. यातील एक ट्रक हा लोखंडी रॉड घेऊन जात होता. ही घटना शिंगणापूर फाट्याजवळ गुरुवारी (दि ४) रात्री ११.३० च्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक मध्ये असलेल्या लोखंडी रॉड हे चलकांच्या अंगात घुसले. अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर अमरावती महामार्गावर लोखंडी रॉड घेऊन एक ट्रक जात होता. हा ट्रक भरधाव होता. दरम्यान, रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यावेळी समोरून येणाऱ्या एका ट्रकवर जाऊन हा ट्रक धडकला. या घटनेत दोन्ही ट्रक मधील ड्रायव्हर व क्लिनर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्हीही ट्रकचा पुढील भागाचा पूर्णतः चक्काचूर झाला. ट्रक मधील लोखंडी रॉड हे काचेतून बाहेर आले. लोखंडी रॉड शरीरातून आरपार गेल्याने चारही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच नांदगावचे ठाणेदार विशाल पोळकर, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप कांबळे, विवके राणे, गोपाल तायडे आदी घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर मृतदेह काढण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. या अपघातामुळे या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. जवळपास ८ किलोमीटर पर्यन्त वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळ पर्यन्त ही वाहतूक खोळंबली होती. पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर या ११ जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा ठरला आहे.महामार्गावरील खड्डे हे वाढत्या अपघातास कारणीभूत ठरत आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत पावणेआठ हजार अपघाती मृत्यू झाले आहेत.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग