- अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे एका नवऱ्याने घरगुती वादातून आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली. या नंतर पतीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
अमरावती : चांदूर बाजार येथे एका पतीने आपल्या पत्नीचा घरगुती कारणातून चाकूने भोसकून खून केला. या नंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी येत त्याच्या जीव वाचवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
श्रुतिका काळबांडे (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सतीश ऊर्फ किशोर काळबांडे (वय ४५) असे खून झालेल्या आरोपी पतीचे नव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य हे येथील महात्मा फुले कॉलनी परिसरात एक वर्षापासून भाड्याने राहत होते. त्यांच्यात किरकोळ करणावरून सातत्याने वाद होत होते. शुक्रवारीही त्यांच्यात भांडण झाले होते. यावरून राग आल्याने त्याने श्रुतिका हीच चाकूने भोसकून खून केला. यानंतर त्यानेही गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शेजऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी वेळीच दाखल होऊन त्याला वाचविले. त्याला अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत श्रुतिका काळबांडे या चांदूर बाजार येथील खाजगी शिक्षण संस्था शिक्षिका होत्या. त्या आपल्या १५ वर्षीय मुलासोबत महात्मा फुले कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहत होत्या, तर आरोपी पती सतीश काळबांडे कोल्हा काकडा या मूळ गावी राहत होता. तीन दिवसांपूर्वी तो चांदूर बाजार येथे आला असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.