मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati Crime: दारूड्या पतीने कौर्याची सीमा ओलांडली, पत्नीला गॅसवर ठेवून पेटवलं

Amravati Crime: दारूड्या पतीने कौर्याची सीमा ओलांडली, पत्नीला गॅसवर ठेवून पेटवलं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 18, 2024 08:20 PM IST

Amravati Crime News : पतीने पत्नीला गॅस शेगडीवर ठेऊन जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात पत्नी गंभीर भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Amravati Crime
Amravati Crime

पतीने पत्नीला ठार मारल्याच्या तसेच दोघांमधील वादातून गुन्हे घडल्याच्या घटना नियमितपणे समोर येत असतात. मात्र अमरावती जिल्ह्यातून पतीने कौर्याच्या सर्व परिसीमा ओलांडल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत पत्नी गंभीररित्या भाजली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार मुकेश तिडके असे आरोपीचे नाव असून त्याला दारूचे व्यसन आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील कापुसतळणी गावात घडली. दारूच्या व्यसनामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. यातूनच आरोपीने पत्नीला जिंवत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

आरोपी मुकेश व त्याच्या पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी तू कामाला जात नाहीस, घरात बसून असतेल, तू वागायला चांगली नाहीस, येथे राहू नकोस असे म्हणत त्याने पत्नीला गॅस शेगडीवर ठेवले व गॅस पेटवला. या घटनेत पत्नीचा पाय जळाला आहे. 

पीडिते महिलेने आरोप केला की, यापूर्वी पती छळ करत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करूनही पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. सध्या पीडित महिलेवर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपी पती फरार असून. त्याच्याविरुद्ध माहुली जहागिर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग