Amravati bus accident: अमरावतीत प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू; २० हून अधिक जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati bus accident: अमरावतीत प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू; २० हून अधिक जखमी

Amravati bus accident: अमरावतीत प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू; २० हून अधिक जखमी

Mar 24, 2024 03:49 PM IST

Amravati Bus Accident : प्रवाशांनी भरलेली बस परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावरुन जात होती. यावेळी वळणा-वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा मोठा अपघात झाला.

अमरावतीत  प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली
अमरावतीत  प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

अमरावती जिल्ह्यात बसला मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चिखदाराजवळ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजते तर जवळपास २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

परतवाडा सेमाडोह घाट मार्गावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही बस परतवाडाहून प्रवाशांना घेऊन तुकईथळ येथे जात होती. मृतांमध्ये दोम महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे.

प्रवाशांनी भरलेली बस परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावरुन जात होती. यावेळी वळणा-वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा मोठा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी घटनास्थळी धावले. प्रवाशांना दरीतून वर काढून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर