मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ऐतिहासिक क्षण! अमरावती-अकोला रस्त्याचे काम ५ दिवसात पूर्ण, गिनीज बुकमध्ये नोंद

ऐतिहासिक क्षण! अमरावती-अकोला रस्त्याचे काम ५ दिवसात पूर्ण, गिनीज बुकमध्ये नोंद

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 08, 2022 09:41 AM IST

अमरावती-अकोला रस्त्याच्या कामाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली हा ऐतिहासिक क्षण असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

अमरावती - अकोला महामार्गाचे काम ५ दिवसात पूर्ण
अमरावती - अकोला महामार्गाचे काम ५ दिवसात पूर्ण (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्ग अवघ्या ५ दिवसात पूर्ण कऱण्यात आला. तब्बल ७५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम कमी वेळेत पूर्ण केल्यानं याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या रस्त्याच्या निर्मितीचा एक ऐतिहासिक आणि जागतिक असा विक्रम झाला. याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. (Amravati to Akola national highway complete in 5 days guinness book of world record)

अमरावती ते अकोला या महामार्गाचे काम ३ जून रोजी सुरू झाले होते. ते ७ जून रोजी संपले. ७५ किमीचा हा रस्ता ५ दिवसात पूर्ण करण्यात आलं. राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने याचं बांधकाम केलं असून लोणी ते बोरगावमंजू या ७५ किलोमीटर रस्त्याचं बांधकाम बिटूमिनस काँक्रिट पद्धतीने झाले. गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्रही देण्यात आले. यावेळी नितीन गडकरी यांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती लावली.

रस्त्याच्या कामाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली हा ऐतिहासिक क्षण असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं. त्यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदनही केलं. राजपथ इनफ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि जगदीश कदम यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ७५ किलोमीटरचा बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचं काम तुम्ही पूर्ण केलं. तुमची चिकाटी आणि कामाच्या बळावर नवं व्हिजन तयार होतंय. देशाला तुमचा अभिमान असल्याच्या भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.

अमरावती ते अकोला या राष्ट्रीय महामार्गाचं काम ५ दिवसात पूर्ण करण्याचं शिवधनुष्य ७२८ जणांनी यशस्वीपणे पेललं. अमरावतीच्या लोणी ते अकोल्यातील मुर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचं काम ३ ते ७ जून या कालावधीत पूर्ण करण्याची योजना कंपनीने आखली होती. ३ जून रोजी सकाळी सहा ते ७ जूनला सायंकाळी ५ वाजेपर्यंत बिटुमिनस काँक्रिटच्या रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी ७२८ जणांनी काम केले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग