मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati Accident: अमरावतीत खाजगी बस आणि काँक्रिट मिक्सरमध्ये भीषण धडक; चार जणांचा मृत्यू, १० जखमी

Amravati Accident: अमरावतीत खाजगी बस आणि काँक्रिट मिक्सरमध्ये भीषण धडक; चार जणांचा मृत्यू, १० जखमी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 18, 2024 12:17 PM IST

Amravati Road Accident: अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर खाजगी बस आणि काँक्रिट मिक्सरमध्ये झालेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Amravati accident
Amravati accident

Amravati bus and concrete mixer Accident: अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर आज सकाळी खाजगी बस आणि काँक्रिट मिक्सर यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १० जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजच्या दिवसाची सुरुवात भीषण अपघाताने झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील कबड्डीपटू हे यवतमाळ येथील सुरू असलेल्या एका स्पर्धेसाठी ट्रॅव्हल्सने जात होते. मात्र, अमरावती नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर समोरुन येणाऱ्या काँक्रिकट मिक्सने त्यांच्या बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसचा समोरील भागचा अक्षरक्ष:चक्काचूर झाला. या अपघातात चार खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १० जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर परिसरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृतांच्या नावांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पुण्यातील विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू

पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळ कार- टेम्पो आणि कंटेनर यांच्यात विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर भोररवाडी तांबडे मळा येथे सकाळी घडली.

IPL_Entry_Point

विभाग