मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  buldhana : मोताळा नगरपंचायतीत शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा धक्का! ८ नगरसेवकांचं पक्षांतर

buldhana : मोताळा नगरपंचायतीत शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा धक्का! ८ नगरसेवकांचं पक्षांतर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 30, 2023 01:10 PM IST

Motala Nagar Panchayat buldhana : अमरावतीच्या मोताळा नगरपंचायतीमधील काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Buldana News
Buldana News

buldhana : पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात शिंदे गटाने काँग्रेसला दणका दिलाय. मोताळा नगरपंचायतीमधील काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला. मोताळामध्ये झालेल्या या पक्षप्रवेशाचा विधानपरिषद निवडणूक मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात पदवीधर निवणुकीची रणधुमाळी सुरू असताना बुलढाण्यात काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसला खिंडार पाडत नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचलं आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गायकवाड यांचे फोनद्वारे अभिनंदन केले. याचबरोबर नगरसेवकांच्या वॉर्डातील विकासकामांसाठी नगरविकास खात्यातून निधी देण्याचेही एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.

अमरावतीत आज सकाळी आठ वाजल्यापासून पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. अमरावती पदवीधरमध्ये डॉ. रणजित पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्यात मुख्य लढत आहे. यासाठी अमरावती विभागात २६२ मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. २ फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

शिवसेना माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेना माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातला पहिला नगरसेवक शिंदे गटात सामील झाला आहे. संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते.

WhatsApp channel