MNS Protest in Pune: पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मूक मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये शहरातील विविध भागांतील विद्यार्थी आणि मनसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी प्रवेशद्वारावरच रोखून धरले. फक्त शिष्टमंडळाला आत जवून कुलगुरू सुरेश गोसावी आणि विद्यापीठ प्रशासनाची भेट घेण्याची मंजूरी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. आधीच या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. या मोर्चामुळे त्यात आणखी भर पाडली आहे.
पुणे विद्यापीठातील आणि पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज सकाळी सेनापती बापट मार्गाने मोर्चा काढण्यात आला. सकाळी ९.३० वाजता हा मोर्चा सुरू करण्यात आला. अमित ठाकरे यांच्या सोबत शर्मिला ठाकरे देखील या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे तीन हजार, तर पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील संलग्न ८०० महाविद्यालयांमध्ये सुमारे सात लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणानंतर, त्यांच्या रोजगारासाठी विद्यापीठाने शैक्षणिक संकुलात रोजगार मेळावे घ्यावेत. विद्यापीठात शिकणाऱ्या साधारण हजार विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहाची कमतरता आहे. त्यामुळे तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच वसतीगृहात राहणार्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकाराचे जेवण मिळावे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ही मराठी भाषेचा प्रसार प्रचार करण्यासाठी झाली आहे. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करून ते विद्यार्थी, नागरिकांसाठी खुले करावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
या मोर्चात शेकडो विद्यार्थी आणि कार्यकर्ते जमले. विद्यापीठ चौकात हा मोर्चा शांततेत पार पाडावा, असे आवाहन अमित ठाकरेंनी केले. हा मोर्चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोहोचला आणि अमित ठाकरे आणि कार्यकर्त्यांनी मुख्य इमारतीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला आहे. विद्यापीठात्या मुख्य इमारतीजवळ कार्यकर्त्यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला. फक्त शिष्टमंडळ घेऊन जाऊन कुलगुरुंना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या मोर्चाला सेनापती बापट मार्गाने सुरुवात झाली. हा मोर्चा या मार्गाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौका पर्यन्त आला . मात्र, या दरम्यान, मोठी वाहतूक कोंडी या मार्गावर झाली. रोज वाहतूक कोंडीने त्रस्त झालेले नागरिक या मोर्चामुळे आणखी वैतागले.
संबंधित बातम्या