उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून BJP च्या कौतुकानंतर अमित शहांचा शिर्डीतून दोन्ही नेत्यांवर जबरदस्त प्रहार, म्हणाले..
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून BJP च्या कौतुकानंतर अमित शहांचा शिर्डीतून दोन्ही नेत्यांवर जबरदस्त प्रहार, म्हणाले..

उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून BJP च्या कौतुकानंतर अमित शहांचा शिर्डीतून दोन्ही नेत्यांवर जबरदस्त प्रहार, म्हणाले..

Jan 12, 2025 05:48 PM IST

Amit Shah On Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात१९७८पासून शरद पवार यांनी दगा-फटक्याचे राजकारण सुरु केले त्याला जनतेने २० फूट जमिनीत गाढण्याचे काम केले आहे, असा घणाघात अमित शहा यांनी शरद पवारांवर केला आहे.

शिर्डी अधिवेशनात बोलताना अमित शहा
शिर्डी अधिवेशनात बोलताना अमित शहा

Amit Shah on Sharad Pawar and Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे व शरद पवारांकडून भाजप व संघाचे कौतुक केले जात होते. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत होतं. मात्र आज शिर्डीत पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान हल्ला चढवला. महाराष्ट्राच्या राजकारणात १९७८ पासून शरद पवार यांनी दगा-फटक्याचे राजकारण सुरु केले त्याला जनतेने २० फूट जमिनीत गाढण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये आपल्यासोबत विश्वासगात केला. त्यांनाही त्यांची जागा दाखवून दिली आहे. आपल्यासोबतच खरी शिवसेना व राष्ट्रवादीचाही मोठा विजय झाला आहे.

भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप रविवारी शिर्डीत झाला. या समारोप समारंभास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. यावेळी त्यांनी महाआघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

अमित शहा म्हणाले की, १९७८ मध्ये शरद पवार यांनी बंडखोरी करत सरकार बनवले होते. विश्वासघाताचे जे राजकारण त्यांनी महाराष्ट्रात सुरु केले होते, त्याला धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेने केले होते. उद्धव ठाकरेंनीही २०१९ च्या निवडणुकीनंतर आमच्यासोबत द्रोह केला. त्यांनी विचारधारा सोडली.

बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. त्या उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याचं कामही तुम्ही केले. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्र जेव्हा जेव्हा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्या-त्या वेळी स्थिर सरकार देण्याचे काम जनतेनं केलं आहे. या विधानसभा निवडणुकीत खरी शिवसेना खऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही विजय केले. घराणेशाही राजकारण करणाऱ्यांना जनतेने नाकारले आहे.सनातन धर्म आणि हिंदुत्वाचा महाराष्ट्राने कायमच पुरस्कार केल्याचे शाह म्हणाले.

शरद पवारांचा एक फोटो पाहिला -

अमित शहा म्हणाले, काही दिवसापूर्वीमीशरद पवार यांचा एक फोटो पाहिला. त्यांच्यामागे महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागांचा नकाशा लावला होता. लोकसभेत कोणत्या विभागात काय काय होईल याची भविष्यवाणी ते समोर बसलेल्या पत्रकारांसमोर करीत होते. त्या फोटोचा अर्थ मी त्यांना समजावतो. तुम्ही सांगितलेल्या प्रदेशात आम्ही काय काय केलं.

 

या विधानसभेला आम्ही उत्तर महाराष्ट्रात २२ पैकी २१. कोकणात १७ पैकी १६. पश्चिम महाराष्ट्रात २६ पैकी २४ जागा जिंकल्या. पश्चिम विदर्भात १७ पैकी १६ जागा मिळाल्या. पूर्व विदर्भात २९ पैकी २२ तर मरावाड्यात २० पैकी १९ जागा आम्ही जिंकल्या. मुंबईत १७ पैकी १५ जागांवर विजय मिळला. ज्यांनी आपल्याला धोका दिला त्यांना जागा दाखविण्याचे काम जनतेने केले,असे शाह म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या