गुलेन-बॅरे सिंड्रोमनं वाढवलं टेंशन! केंद्र सरकारने पुण्यात पाठवलं तज्ज्ञांचं पथक, रॅपिड रिस्पॉन्स पथकाची स्थापना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुलेन-बॅरे सिंड्रोमनं वाढवलं टेंशन! केंद्र सरकारने पुण्यात पाठवलं तज्ज्ञांचं पथक, रॅपिड रिस्पॉन्स पथकाची स्थापना

गुलेन-बॅरे सिंड्रोमनं वाढवलं टेंशन! केंद्र सरकारने पुण्यात पाठवलं तज्ज्ञांचं पथक, रॅपिड रिस्पॉन्स पथकाची स्थापना

Jan 28, 2025 07:00 AM IST

Guillain-Barre Syndrome : पुण्यातील जीबीएसरुग्णांची संख्या वाढली आहे. पुण्यात १११ बाधित रुग्ण असून त्यात ६८ पुरुष आणि ३३ महिलांचा व काही मुलांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गुलेन-बॅरे सिंड्रोमनंवाढवलं केंद्राचं टेंशन! पुण्यात पाठवलं तज्ज्ञांचं पथक, केंद्रीय रॅपिड रिस्पॉन्स पथकाची स्थापना
गुलेन-बॅरे सिंड्रोमनंवाढवलं केंद्राचं टेंशन! पुण्यात पाठवलं तज्ज्ञांचं पथक, केंद्रीय रॅपिड रिस्पॉन्स पथकाची स्थापना (HT_PRINT)

Guillain-Barre Syndrome : पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  जीबीएसची प्रकरणे हाताळण्यासाठी राज्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय आरोग्य पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. हे पथक पुण्यात या आजाराबद्दल माहिती घेणार असून, त्या बाबत माहिती घेणार आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने  सांगितले की, जीबीएसच्या संशयित व  लागण झालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सल्ला  व  त्यांना मार्गदर्शन हे पथक करणार आहे.  

केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली, निमहान्स, बेंगळुरू, प्रादेशिक आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालय आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या ७  तज्ज्ञांचा समावेश आहे. पुण्यातील एनआयव्हीचे तीन तज्ज्ञ स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत. हे केंद्रीय पथक राज्याच्या आरोग्य विभागासोबत काम करणार असून या आजाराचा आढावा घेणार आहे. तसेच आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांबाबत देखील  शिफारस करणार आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच राज्याशी समन्वय साधून आवश्यक पावले उचलली जात आहे.  

एका रुग्णाचा मृत्यू  

महाराष्ट्रातील सोलापुरात जीबीएसशी संबंधित एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात जीबीएस बाधितांची संख्या ही १११ च्या वर गेली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे  केंद्रीय आरोग्य मंत्रालय  सतर्क झाले आहे. या आजाराने बाधित असलेल्या सोलापूरच्या  एका तरुणाचा परतीच्या प्रवासात सोलापुरात मृत्यू झाला. 

पुण्यातील एकूण जीबीएस रुग्णांची संख्या रविवारी १११ वर पोहोचली असून त्यात  ६८ पुरुष आणि ३३ महिलांचा समावेश आहे. यापैकी १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळले असून रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) आणि पुणे महापालिकेच्या आरोग्य विभाग या परिसरातील नमुने गोळा करत आहेत.  

जीबीएस बाधितांची वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी व नियोजन करण्यासाठी  राज्याला मदत करण्यासाठी तज्ञांचे सात सदस्यीय उच्चस्तरीय पथक महाराष्ट्रात तैनात करण्यात आले आहे.  जीबीएस हा  एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे अचानक सुन्नपणा व  स्नायू कमकुवत होतात, या आजारामुळे  अशक्तपणा आणि अतिसार प्रामुख्याने ही लक्षणे दिसतात. डॉक्टरांच्या मते, बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे सामान्यत: जीबीएस होतो.  कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर