Kim Jong Un News: उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी मोठ्या प्रमाणात आत्मघातकी ड्रोन तयार करण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडेच किम यांनी ड्रोनची चाचणी पाहिली आहे. उत्तर कोरियाकडून प्रथमच ऑगस्टमध्ये हे ड्रोन समोर आणले गेले. उत्तर कोरियाने हे तंत्रज्ञान रशियाकडून घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, हे ड्रोन जमीन आणि समुद्र या दोन्ही ठिकाणी मारा करू शकतात. उत्तर कोरियाच्या मानवरहित एरियल टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्स म्हणजेच यूएटीसीने हे ड्रोन तयार केले आहेत. कोरियाच्या केसीएनए वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांनी आत्मघाती हल्ला ड्रोनच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाच्या गरजेवर भर दिला आहे.
खरे तर हे आत्मघातकी ड्रोन स्फोटकांनी भरलेले असतात. शत्रूच्या लक्ष्यांवर हल्ले करणे हे त्यांचे मुख्य काम असते. विशेष म्हणजे ते गाइडेड क्षेपणास्त्रांप्रमाणे काम करतात. एजन्सीने म्हटले आहे की, विविध फायरपॉवर क्षेत्रात आत्मघातकी ड्रोनचा वापर केला जाईल. जमीन आणि समुद्रात असलेल्या शत्रूंच्या लक्ष्यावर अचूक हल्ला करणे हे त्यांचे मुख्य काम असेल.
ऑगस्टमध्ये जेव्हा या ड्रोनचे पहिल्यांदा अनावरण करण्यात आले होते, तेव्हा तज्ज्ञांनी त्यांचा संबंध उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील सहकार्य मजबूत करण्याच्या शक्यतांशी जोडला होता. उत्तर कोरियाने हे तंत्रज्ञान रशियाकडून घेतले असण्याची शक्यता आहे. रशियाने ते इराणकडून विकत घेतल्याचे बोलले जात असून इराणने ते इस्रायलकडून हॅक करून मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे ड्रोन इस्रायलच्या एचएआरओपी आत्मघातकी ड्रोन, रशियाच्या लॅन्सेट-३ आणि इस्रायलच्या हिरो ३० सारखेच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, २०२२ मध्ये उत्तर कोरियाने सीमेपलीकडे ड्रोन पाठवले, ज्यावर दक्षिण कोरियाचे सैन्य गोळीबार करू शकले नाही. ते म्हणाले की, हे ड्रोन अतिशय लहान आहेत. आता गेल्या वर्षी दक्षिण कोरियाकडूनही ड्रोन ऑपरेशनच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून धोक्यांचा सामना करता येईल. किम यांनी यापूर्वीच दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाचा मुख्य शत्रू म्हटले आहे.
किम जोंग उनला जगभरात खूप धोकादायक मानले जाते, तो इतका धोकादायक आहे की, अमेरिकेसारखा देशही त्यांना घाबरतो. किम जोंग उन हे उत्तर कोरियाच्या शत्रूंसाठी धोकादायक तर आहेतच, पण त्यांना आपल्या देशातील जनतेवरही दयामाया नाही. त्यांचे असे अनेक निर्णय आहेत, जे ऐकून कोणालाही धक्का बसेल. एखाद्याला शिक्षा देण्यासाठी जोंग अत्यंत भयानक आणि वेदनादायक पद्धती अवलंबतो. गुन्हेगारांना तोफेच्या तोंडात बांधून उडवणे किंवा माशांसमोर जिवंत फेकणे अशा शिक्षा जोंग देतो. एवढेच नाही तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किम जोंगने आपल्या काकांनाही सोडले नाही. त्याने काकांनाही शिकारी कुत्र्यांसमोर जिवंत फेकले होते.