आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Published Oct 05, 2024 05:44 PM IST

amhi satarkar vikas pratishthan : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबई, ठाणे व आसपासच्या भागांतील सातारावासीयांचा दसरा मेळावा गुरुवार, १० ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

amhi satarkar vikas pratishthan : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबई, ठाणे व आसपासच्या भागांतील सातारावासीयांचा दसरा मेळावा गुरुवार, १० ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा मेळावा होईल. प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या सातारा रत्न व सातारा भूषण पुरस्कारांचे वितरण यावेळी केले जाणार आहे. महंत स. भ. मोहनबुवा रामदासी, विजय शिर्के, कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर, अभिनेते भाऊ कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात रामराजे नाईक-निंबाळकर (राजकारण), राहुल भंडारे (कला), मनोज धुमाळ (कामगार), विनया माने (क्रीडा), अरुण गोडबोले (साहित्य), अंजली गोडसे (शिक्षण), विकास धनवडे (सामाजिक), शिवाजीराव माने (उद्योग), निलेश बुधावले (पत्रकारिता), डॉ. अरुण माने (वैद्यकीय), अ‍ॅड. पांडुरंग पोळ (कायदा), आयपीएस सोमनाथ घार्गे (प्रशासकीय सेवा), विनायक गाढवे (सहकार) यांना ‘सातारा रत्न’ देऊन गौरवण्यात येणार आहे. तर, किरण सोनवणे, संपत शेवाळे, सुरेश गोडसे, प्राची कोल्हटकर-जांभेकर, कु. भार्गव जगताप यांच्यासह वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांना सातारा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

संघटनेचे अध्यक्ष नाना निकम, उपाध्यक्ष बाबुराव माने, राजाराम शिंदे, महेश पवार, दिपक यादव, श्रीधर फडतरे, दिनकर गाढवे, दत्ताजीराव फाळके, अनिल जाधव, सुभाष चव्हाण, एकनाथ तांबवेकर, शिवाजीराव जाधव, अशोक चव्हाण, रमेश मोरे, पद्मावती शिंदे, आसावरी भोईटे, सागर घाडगे, समर्थ देशमुख आदी विश्वस्त व इतर मान्यवर देखील उपस्थित राहतील. यावेळी सोनं वाटप करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातील. सातारकरांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावं, असं आवाहन प्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख कृष्णा नलवडे यांनी केलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर