American women found in Sindhudurg : सिंधुदुर्गातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात अमेरिकन महिला (Sindhudurg foreign woman)साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. अन्न पाण्याविना तिची दयनीय अवस्था झाली होती. यानंतर जिल्हासह संपूर्ण देशात खळबळ माजली होती. तसेच याची अमेरिक दुतावासानेही दखल घेतली होती. आता याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मी स्वत:च आपला जीव संपवण्यासाठी जंगलात साखळदंडाने बांधून घेतलं होतं. मला मरायचं होतं,माझा भारतातील व्हिसा संपला होता,अशी कबुली या महिलेने दिल्याने पोलीसही चक्रावले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील जंगलात ही महिला मुसळधार पावसात साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळली होती. तिच्या नवऱ्यानेच तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय होता. मात्र या महिलेनेच आता धक्कादायक कबुली दिली आहे. मानसिक आजारपणातून आपण स्वतःला संपवण्यासाठी जंगलात स्वत:ला बांधून घेतल्याचा बनाव केला होता. पण ऐनवेळी मला जीवन संपवणे चुकीचं असल्याचं वाटल्याने बचावासाठी आरडाओरडा केला. त्याचबरोबर महिलेने सांगितले की, तिचे लग्नच झालेले नाही. ती १० वर्षे तामिळनाडूमध्ये राहिली होती. सध्या या महिलेवर मानसोपचार सुरू आहेत.
प्रकृती ढासळलेल्या या महिलेला उपचारासाठी गोव्याला हलवले होते. महिलेसोबत अमानवीय घटना घडल्याने याची दखल अमेरिकन दुतावासाने घेतली असून या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
सोनुर्लीच्या जंगलात एका गुराख्याला ही महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत दिसली होती. त्याने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तिची सुटका करण्यात आली. त्यावेळी तने आपल्या पतीनेच तेथे बांधून ठेवल्याचं तसंच आपल्याला उपाशी ठेवून छळ केल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर तिच्याकडे तामिळनाडूचा पत्ता असलेले आधारकार्ड मिळाले होते. त्यानुसार पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या शोधासाठी तामिळनाडू गाठलं होतं. मात्र तिने दिलेल्या पत्त्यावर कोणतंही घर नव्हतं तर तेथे दुकान होते. त्याचबरोबर महिलेने सांगितलेल्या नावाचा व्यक्ती अस्तित्वातच नव्हता.
पोलिसांनी केल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या होत्या. ही महिला गोव्यात तसेच मुंबईत एकटीच फिरताना सीसीटीव्हीत दिसत होती. तिच्यावर गोव्यातील रुग्णालयात मानसिक उपचार झाल्याचं देखील उघडकीस आलं. महिलेजवळील मोबाईल आणि टॅब आढळला होता. त्यावर आढळेल्या माहितीनुसार ती मुंबई आणि गोवा येथेच जास्त राहिल्याचे समोर आले. त्यामुळे ती ज्या स्थितीत जंगलात आढळून आली आणि तिने जो जबाब दिला,तो बनाव असल्याचा संशय पोलिसांना आला.
या महिलेकडे मोबाईल आणि टॅब तसेच३१हजार रुपये रोख सापडले होते. तिच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.