मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal Ambulance Fire: यवतमाळ येथे गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका अचानक पेटली!

Yavatmal Ambulance Fire: यवतमाळ येथे गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका अचानक पेटली!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 05, 2024 06:57 PM IST

Yavatmal Ambulance Caught Fire: यवतमाळमध्ये गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका अचानक पेटल्याने परिसरात खळबळ माजली.

यवतमाळमध्ये गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला.
यवतमाळमध्ये गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला.

Yavatmal Arni Ambulance Fire: यवतमाळ जिल्ह्यातून सर्वांच्या भुवया उंचवणारी माहिती समोर आली. आर्णी येथील गर्भवर्ती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने अचानक पेटल घेतल्याने परिसरात खळबळ माजली. पंरतु, रुग्णवाहिकेच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. रुग्णवाहिकेने पेट घेतल्याचे समजात चालकाने गर्भवती महिलेसह दोन जणांना बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊपर्यंत रुग्णवाहिका अक्षरक्ष: जळून खाक झाल्याचे समजते.

ट्रेंडिंग न्यूज

Nashik Accident : नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात; कार आणि दुचाकीच्या धडकेत पाच जण ठार

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त रुग्णवाहिका आज सकाळी आर्णी येथील गर्भवर्ती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जात होती. मात्र, गुरुद्वारा परिसरात सकाळी ११ वाजताच्या सुमारास रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. रुग्णवाहिकेने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गर्भवती महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेच्या चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Pune Police suicide : पुणे हादरले! पोलिस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या; खडक पोलीस ठाण्यातील घटना

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत रुग्णवाहिका अर्ध्याहून जळून खाक झाली होती. रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर होते. यामुळे संभाव्य स्फोटाची भिती व्यक्त केली जात होती. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Mumbai: युट्युब व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न, मुंबईतील सांताक्रूझ येथील घटना

 

छत्रपती संभाजीनगर: कपड्याच्या दुकानाला आग, सात जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील छावणी परिसरात बुधवारी (३ एप्रिल २०२४) पहाटे चार वाजता कपड्याच्या दुकानाला आग लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे.दुकानाला आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत.सर्व मृतांच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.आलम दर्जी नावाच्या व्यक्तीच्या दुकानाला आग लागली आणि त्यांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर लोक राहत होते. या सर्वांचा मृत्यू गुदमरून झाल्याचा अंदाज आहे. आसिम वसीम शेख (वय,३), परी वसीम शेख (वय,२), वसीम शेख (वय, ३०), तन्वीर वसीम शेख (वय,२३), हमीदा बेगम (वय, ५०), शेख सोहेल (वय, 35), रेश्मा शेख (वय, २२) अशी मृतांची नावे आहेत.

IPL_Entry_Point

विभाग