मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar : आरोग्य खात्यात रुग्णवाहिका खरेदीत तब्बल साडेसहा हजार कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Rohit Pawar : आरोग्य खात्यात रुग्णवाहिका खरेदीत तब्बल साडेसहा हजार कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 02, 2024 07:37 AM IST

ambulance scams in health department of maharashtra : आरोग्य खात्यात रुग्णवाहिका खरेदीत तब्बल साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.

आरोग्य खात्यात रुग्णवाहिका खरेदीत तब्बल साडेसहा हजार कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
आरोग्य खात्यात रुग्णवाहिका खरेदीत तब्बल साडेसहा हजार कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

ambulance scams in health department of Maharashtra : आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत घेत आरोग्य खात्यातील मोठा घोटाळा पुढे आणला आहे. या बाबतचे कागदपत्रे सादर करत रुग्णवाहिका खरेदीत तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने निविदा देण्यात आल्या असून केवळ दोन कंपन्यांसाठी पायघड्या घालण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Indian Railway : मध्य रेल्वेची मोठी घोषणा! राज्यातून उत्तर भारतात जाण्यासाठी १५६ उन्हाळी स्पेशल गाड्या धावणार

आमदार रोहित पवार यांच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने रुग्णवाहिका खरेदेत साडेसहा हजार कोटींचा घोटाळा केला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या ‘बीव्हीजी’ आणि ‘सुमित’ या कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने निविदा दिल्या आहेत. यातून त्यांनी हा घोटाळा केल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. निवडणूक निधीसाठी या दोन कंपन्यांना पायघड्या घातल्या गेल्या असून या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच तानाजी सावंत यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी देखील आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Maharashtra Weather Update : एप्रिल महिन्यात राज्य तापणार; मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट

पवार म्हणाले, आरोग्यमंत्री सावंत हे हाफकिन संस्था ओळखण्यात चूक करतात पण पैसे खाण्यात मात्र त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. त्यांनी या घोटाळ्यातून जमा केलेला पैसा हा चुकीच्या पद्धतीने निवडणुकीत वापरला जाऊ शकतो. अत्यावश्यक सेवांसाठी दावोसमध्ये राज्याने स्पॅनिश कंपनीबरोबर करार केला. तर पिंपरी-चिंचवड येथील सुमित कंपनीने त्यांना निविदा करून दिली. मात्र हीच कंपनी टेंडरमध्ये भागधारक झाली.

Akola Lok Sabha: अकोल्यातून काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी, प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा नाहीच

त्यांना रुग्णवाहिका पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. सुमित कंपनीला काम मिळाल्यानंतर बीव्हीजी कंपनीने देखील या बाबत तक्रार केल्यावर त्यांचा देखील निविदेमध्ये समावेश करण्यात आला. बीव्हीजी कंपनी अनेक ठिकाणी ब्लॅकलिस्ट झाली असतांना त्यांना कंत्राट देण्यात आले. या साठी दिल्लीतून दबाव आणण्यात आला. तर रुग्णवाहिका खरेदीसाठी दोनवेळा निविदा काढल्या गेल्या. या रुग्णवाहिका बाजारदरापेक्षा दुप्पट दराने विकत घेण्यात आल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान या घोटाळ्यातील पैसा निवडणूक निधी म्हणून वापरला जाणार असून याचे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्री सावंत यांनी येत्या पाच दिवसांत भूमिका स्पष्ट करावी आणि सरकारने देखील या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांचे आरोप बिनबुडाचे : आरोग्य मंत्री

रोहित पवार यांनी रुग्णवाहिका खरेदीत झालेल्या घोटाळ्याचे आरोप चुकीचे असल्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागाने देखील खुलासा केला असून आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शकप्रमाणे राबविण्यात असून यात गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही असे आरोग्य विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

IPL_Entry_Point