Lalbaghcha Raja : अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला २० किलो वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण; किती असेल किंमत?-ambani family offers golden crown to lalbaghcha raja 20 kg gold price 15 crores ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lalbaghcha Raja : अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला २० किलो वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण; किती असेल किंमत?

Lalbaghcha Raja : अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला २० किलो वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण; किती असेल किंमत?

Sep 05, 2024 11:50 PM IST

lalbaghcha raja : अनंत अंबानी, रिलायन्स फाऊंडेशनने लालबागच्या राजाला हा सोनेरी मुकूट दिला असून याचे वजन २० किलो एवढे असणार आहे. चालू बाजारभावाप्रमाणे याची किंमत १५ कोटीच्या घरात आहे.

लालबागचा राजा
लालबागचा राजा

Lalbaghcha Raja Ganpati News : ही शान कुणाची.. लालबागच्या राजाची अशा जयघोषात आज लागबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे.  मरून रंगाच्या वेशभूषेत मयूरासनावर विराजमान यंदाच्या लालबागचा राजाचे गोजिरे रुप भाविकांनी आपल्या डोळ्यात साठवले आहे. लालबागच्या राजाची पहिली झलक अनेक भक्तांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पाहिली. यंदाच्या लालबागच्या राजाचा मुकूट सोनेरी असून मुकेश अंबानी कुटुंबीयांकडून हा मुकूट राजाला अर्पण करण्यात आला आहे. अनंत-राधिका यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने अंबानी कुटूंबीयांनी हा मुकूट भेट दिला आहे.

आज लालबागच्या राजाचा (Lalbaghcha Raja)  प्रथम दर्शन सोहळा पार पडला यावेळी मयूरासनावर विराजमान सोन्याचं मुकूट परिधान केलेला राजा पाहून भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं.लालबागच्या राजाची मनमोहक अशी १४ फुटाचीआकर्षक मूर्ती असून यंदा बाप्पा मयूरासनावर विराजमान आहे. अनंत अंबानी, रिलायन्स फाऊंडेशनने लालबागच्या राजाला हा सोनेरी मुकूट दिला असून याचे वजन २० किलो एवढे असणार आहे. चालू बाजारभावाप्रमाणे याची किंमत १५ कोटीच्या घरात आहे. हामुकूट बनविण्यासाठी कारागिरांना दोन महिने लागले आहेत. लालबागच्या राजा गणेश मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी आज प्रथम दर्शन सोहळा सुरु होण्यापूर्वी याची माहिती दिली आहे.

अनंत अंबानी गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या विविध कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित असतात. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून लालबागच्या राजाच्या मंडळाला विविध उपक्रमांसाठीही अंबानी कुटुंबीयांकडून मदत केली जाते.

लालबाग राजाच्या दर्शनासाठी व बाप्पाच्या चरणांवर नतमस्तक होण्यासाठी देश-विदेशातील मान्यवर तसेच देशातील राजकीय, मनोरंजन, उद्योग तसेच अन्य क्षेत्रातील अनेक दिग्गज येत असतात. देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती अंबानी कुटूंबीय दरवर्षी सहपरिवार मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतं.

अंनत अंबानी लालबागचा राजाच्या मंडळात -

मुकेश अंबानी यांचे धाकडे चिरंजीव अनंत अंबानी यांची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मंडळानं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.