मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अनंत आणि राधिका यांच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाचे मोठे पाऊल! पालघरमध्ये वंचित जोडप्यांसाठी आज सामूहिक विवाह सोहळा

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाचे मोठे पाऊल! पालघरमध्ये वंचित जोडप्यांसाठी आज सामूहिक विवाह सोहळा

Jul 02, 2024 01:27 PM IST

Ambani Family Announce Mass Wedding in Palghar : मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनी अनंत आणि राधिकाच्या शाही विवाह सोहळ्याआधी पालघरध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यात वंचित जोडप्यांचे थाटामाटात लग्न पार पडणार आहे.

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाचे मोठे पाऊल! पालघरमध्ये वंचित जोडप्यांसाठी आज सामूहिक विवाह सोहळा
अनंत आणि राधिका यांच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाचे मोठे पाऊल! पालघरमध्ये वंचित जोडप्यांसाठी आज सामूहिक विवाह सोहळा

Ambani Family Announce Mass Wedding in Palghar : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंन्ट यांचा शाही विवाह सोहळा १२ जुलै रोजी पार पडणार आहे. हा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, या सोहळ्या आधी आणखी एक खास विवाह सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा देखील जंगी होणार आहे. अंबानी कुटुंबीयांनी वंचित जोडप्यांसाठी शाही सामूदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. पालघरमध्ये हा सोहळा आज होणार आहे. या सोहळ्याची चर्चा रंगली आहे.

अनंत आणि राधिकाचा साखरपुड्याचा जंगी सोहळा पार पडला. भव्य दिव्य झालेल्या या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. या साखर पुड्याची मोठी चर्चा जगभरात होती. आता दोघांचाही शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र, त्या अधिक मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. लग्नापूर्वी त्यांनी वंचित जोडप्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा विवाह सोहळा देखील जंगी होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन पालघरध्ये करण्यात आले असून हा सामुहिक सोहळा आज २ जुलै रोजी पालघर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे पार पडणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून अंबानी कुटुंबीयांनी सामाजिक भान देखील जपले आहे. हा सामुहिक विवाह सोहळा अनंत अंबानी व राधीका मर्चट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याचा भाग असणार आहे. या सामुहिक लग्न सोहळ्याला संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित राहणार आहेत. या लग्न सोहळ्याची पत्रिकाही समोर आली असून ती सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुकेश अंबानी व निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याकहा विवाह उद्योगपती विरेन व शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी १२ जुलैरोजी होणार आहे. हा भव्य लग्न समारंभ वांद्रे कुर्ला येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामूहिक विवाहाचा उद्देश असंख्य वंचित जोडप्यांना त्यांचे विवाह सन्मानाने आणि आनंदाने साजरे करण्याची संधी प्रदान करणे आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून अंबानी कुटुंबीयांनी सामाजिक भांन देखील जपले आहे. मानवतावादी हेतूने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर