Amazon workers Protest : पुण्यात आणि मुंबईत ॲमेझॉनच्या घरपोच डिलिव्हिरीला आता विलंब होऊ शकतो. कारण कंपनीच्या गोदामतील कामगार हे संपववर गेले आहेत. कंपनीने या कामगारांसोबत ३ महिन्यांपूर्वी माथाडी पद्धतीने या कामगारांना लाभ मिळावेत, असा करार केला होता. याला तीन महीने होऊनही हा करार पाळला गेला नाही. यामुळे कामगारांनी आज पासून (दि १०) काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे.
सध्या ऑनलाइन शॉपिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: ॲमेझॉनवरून ऑर्डर करण्याचे प्रमाण जास्त आहे. कामगारांच्या या संपाचा परिणाम डिलिव्हरीवर होणार आहे. हे आंदोलन हमाल पंचायतीच्या वतीने केले जाणार आहे. ॲमेझॉनची कंत्राटदार कंपनी वैशाली ट्रान्सकॅरिअर्सच्या माध्यमातून गोदामांमध्ये कामगार काम करतात. त्या कामगारांना ४ वर्षांपासून कमी वेतन दिलं जात असून त्यांना इतर लाभ देखील मिळत नाही. त्यामुळे हमाल पंचायतीने कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा केला होता. यामुळे तीन महिन्यांपूर्वी कंपनीने कामगारांसोबत करार करत त्यांना विविध लाभ देण्याचे घोषित केले होते. मात्र, तीन महीने झाले तरी कुणालाच काही लाभ मिळाला नाही. कंपनीने कामगारांसोबत केलेल्या कराराचे पालन केले नाही. त्यामुळे कामगारांना न्याय मिळालेला नसून त्यांनी आज पासून संपायचे हत्यार उपसले आहे. सर्व आज सोमवार पासून काम बंद आंदोलन करणार आहेत. ऑनलाइन माध्यमातून सेवा देणाऱ्या कंपन्यांची संख्या मोठी असून या कंपन्यांची सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविणाऱ्या कामगारांची संख्या देखील मोठी आहे. ऑनलाइन माध्यमातून सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या कामगारांना गिग कामगार संबोधलं जातं. नीती आयोगाच्या अंदाजानुसार देशभरात सुमारे ८० लाख गिग कामगार असून ही संख्या २०२९-३० पर्यंत २.३५ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे.
कंपनीने कामगारांसोबत करार करूनही अद्याप या कराराचे पालन केलेले नाही. त्यामुळे या कंपनीने कायद्याचा भंग केला आहे. कंपनीकडून सातत्याने कामगारांच्या न्याय्य मागण्या दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप देखील कामगारांनी केला असून यामुळे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे कामगारांनी सांगितले. ॲमेझॉनच्या मुंबई व पुण्यातील गोदामांमध्ये काम करणारे कामगार या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती आंदोलनाचे समन्वयक चंदन कुमार यांनी दिली.
संबंधित बातम्या