अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल; २० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 'हे' धमाकेदार फोन-amazon great freedom festival sale 2024 samsung oneplus and other feature loaded smartphones to buy under rs 20000 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल; २० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 'हे' धमाकेदार फोन

अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल; २० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 'हे' धमाकेदार फोन

Aug 06, 2024 08:14 PM IST

Smartphones Under 20000: अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2024 मध्ये बेस्ट डील्ससह 20000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोन्सवर एक नजर टाका.

अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल
अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल

Amazon Great Freedom Festival Sale: अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल आता प्राईम मेंबर्ससाठी लाइव्ह करण्यात आला आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांसाठी दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन अवघ्या २० हजारांच्या आत खेरदी करण्याची संधी उपलब्ध झाली. अ‍ॅमेझॉनवरून २० हजारांच्या स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी यादी तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहकांना कोणता स्मार्टफोन खरेदी करावा, यासाठी मदत होईल.

१) सॅमसंग गॅलेक्सी एम ३५ 5G:

सॅमसंग गॅलेक्सी एम ३५ 5G मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६ इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी यात फ्रंटमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला. यात ६००० एमएएच क्षमतेची लिथियम आयन बॅटरी आणि २५ वॅट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये एक्सीनॉस १३८० चिपसेट देण्यात आला आहे. अँड्रॉइड १४ वर आधारित ओएस आऊट ऑफ द बॉक्स वर चालतो. या चिपसेटमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन डे ब्रेक ब्लू, थंडर ग्रे आणि मूनलाइट ब्लू रंगात उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन १८ टक्के डिस्काउंटवर १९ हजार ९९९ च्या किंमतीत उपलब्ध आहे.

२) वनप्लस नॉर्ड सीई ४ लाइट 5G:

नॉर्ड सीई ४ लाइट 5G मध्ये १२हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २,१०० निट्स पीक ब्राइटनेससह ६.६७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा सोनी एलवायटी ६०० प्रायमरी कॅमेरा देण्यात आला. यात सुपर व्हीओओसी ८० वॅट फास्ट चार्जिंगसह ५ हजार ५०० एमएएच बॅटरी देण्यात आली. हा फोन ऑक्सिजनओएसवर चालतो आणि ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज क्षमतेसह येतो. हा फोन मेगा ब्लू, सुपर सिल्व्हर आणि अल्ट्रा ऑरेंज कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. युजर्सला १९ हजार ९९९ च्या ५ टक्के डिस्काउंट प्राईसवर आणि बँक ऑफर्सचा वापर करून किंमत कमी करता येईल.

३) रियलमी नार्झो ७० प्रो 5G:

रियलमी नार्झो ७० प्रो 5G ६.६७ इंच अमोलेड डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये ५० एमपी फ्लॅगशिप सोनी आयएमएक्स ८९० नाइट व्हिजन मेन कॅमेरा, ८ एमपी वाइड कॅमेरा आणि १६ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी असून ६७ वॅट फ्लॅशचार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. अँड्रॉइड १४ वर चालणारा हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येतो. ग्रीन आणि गोल्ड कलरमध्ये ३० टक्के डिस्काउंट किंमतीत १८ हजार ९९९ रुपये उपलब्ध आहे.

ओप्पो ए3 प्रो 5G:

ओप्पो ए ३ प्रो 5G मध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले आणि १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळतो. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात ४५ वॅट सुपरव्हीओसी चार्जिंगसह ५ हजार १०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० चिपसेट, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. हे अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टीमवर चालते. १३ टक्के सवलतीच्या किंमतीत १९ हजार ९९९ वर उपलब्ध आहे.

रेडमी नोट १३ 5G:

नोट १३ 5G मध्ये १०८०x२४०० पिक्सल रिझोल्यूशन, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १००० निट्स पीक ब्राइटनेससह ६.६७ इंचाचा डिस्प्ले आहे. यात १०८ एमपी ३ एक्स इन सेन्सर झूम एआय ट्रिपल कॅमेरा आहे, ज्यात ८ एमपी अल्ट्रा वाइड सेन्सर, २ एमपी मॅक्रो कॅमेरा आणि १६ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंगसह ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर चालतो आणि मीडियाटेक डायमेंसिटी ६०८० वर चालतो. आर्क्टिक व्हाईट, क्रोमॅटिक पर्पल, स्टेल्थ ब्लॅक आणि प्रिझम गोल्ड कलर व्हेरिएंटमध्ये १६ हजार ९९९ टक्के सवलतीच्या किंमतीत उपलब्ध आहे.

विभाग