Akola School Students Food Poisoning : अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी येत आहे. येथील महानगर पालिकेच्या एका शाळेत शालेय पोषण आहारात मेलेला उंदराचे अवशेष आढळले आहे. या मुळे शाळेतील तब्बल १० मुलांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. या मुलांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अकोला शिवसेना वसाहतमधील शाळा क्रमांक २६ मध्ये असेलेल्या महानगर पालिकेच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. या मुलांच्या पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष आपडले. यामुळे या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. हा आहार खाल्ल्यावर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्यावर त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पालिका प्रशासन काय कारवाई करणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये दुपारच्या वेळेला पोषण आहार दिला जातो. हा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरम्यान, अकोला शहरातिल महानगर पालिकेच्या शाळेतील हा प्रकार गंभीर आहे. खिचडीमध्ये मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहे. विद्यार्थ्यांची जीवाशी खेळ केल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पालिका विभाग आणि शालेय शिक्षण विभागावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या