Akola Crime: अकोल्यात पोटच्या मुलींना बापाने फेकले भीमकुंड नदीत! दोघींचा मृत्यू, बापाला अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Akola Crime: अकोल्यात पोटच्या मुलींना बापाने फेकले भीमकुंड नदीत! दोघींचा मृत्यू, बापाला अटक

Akola Crime: अकोल्यात पोटच्या मुलींना बापाने फेकले भीमकुंड नदीत! दोघींचा मृत्यू, बापाला अटक

Published Oct 06, 2024 11:52 AM IST

Akola Crime news: अकोल्यात बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका पित्याने आपल्याच दोन मुलींना भीमकुंड नदीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अकोल्यात पोटच्या मुलींना बापाने फेकले भीमकुंड नदीत! दोघींचा मृत्यू, बापाला अटक
अकोल्यात पोटच्या मुलींना बापाने फेकले भीमकुंड नदीत! दोघींचा मृत्यू, बापाला अटक

Akola Crime news: अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील बाळापुर येथे एका पित्याने आपल्या पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नदी शेजारी गर्दी केली होती. ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून रात्री शोध कार्य घेतल्यावर दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.

आलिया आणि सदफ असे, या दोघी मृत बहिणींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात ७ आणि ५ वर्षीय बहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिस तपास घेत होते. यावेळी अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे एकाने पूलावरून नदीत दोन महिलांना फेकून दिले. त्यानंतर भीमकुंड नदीत शनिवारी पोलिसांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान रात्री उशिरा दोघींचे मृतदेह पोलिसांना सापडले. दरम्यान, दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.

काय आहे घटना ?

बुलढाण्यातील कदमापूर येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दोघी बहिणी वडीलांसोबत घरून गेल्या होत्या. मात्र, त्या बराच वेळ झाला तरी घरी आल्या नाही. त्यामुळे त्या बेपत्ता असल्याची तक्रार हिवरखेड पोलिसांत नातेवाइकांनी दिली होती.

 यावेळी काही नागरिकांनी एकाने मुलीला पुलावरून नदीत फेकून दिलाची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस तपास करत होते. व नदीपात्रात शोध घेतांना दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दोन्ही मुलींच्या वडिलांना अटक केली आहे. त्यांनी हे पाऊल का उचलले या बाबत चौकशी केली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर