Akola gang rape Crime : पुण्यात कोरेगाव पार्क येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आता अकोला शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. काही तरुणांनी वाढदिवसाच्या पार्टीत शीत पेयातून तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तीन मित्रांसह एका मैत्रिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंटी सटवाले, लल्ला इंगळे अशी दोघा आरोपींची नावे आहे. तर तिसऱ्या आरोपीचे नाव समजू शकले नाही. या प्रकरणी पीडिटेच्या मैत्रिणीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायल असे या तरुणीचे नाव आहे. तिन्ही आरोपी फरार असून पायलला पोलिसांनी अटक केली आहे. तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
पीडित मुलगी ही जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवाशी आहे. ती तिच्या चुलत मावशीकडे अकोल्यात शिकायला आहे. ती सध्या १० वीत शिक्षण घेत आहे. दरम्यान, तिची शाळेतील काही जणांशी मैत्री झाली होती. तिच्या मैत्रिणीने टीची ओळख ही तिचा मित्र बंटी सटवाले याच्याशी करून दिली होती. तसेच त्याने तिच्या चुलत मामीशीसुद्धा भेट करुन दिली होतीय. दरम्यान, चुलत मामीचा पती लल्ला इंगळेने पीडित मुलीला पत्नीचा वाढदिवस असल्याने साजरा करण्याच्या बहाण्याने घरी नेले. त्यानंतर पीडितेचा मित्र बंटी सटवाले, व त्याची मैत्रीण पायल हे देखील त्यांच्या मामीच्या घरी गेले.
यावेळी लल्ला इंगळे व बटी सटवाले यांनी दारू पायली. त्यांनी पीडित मुलीला जबरदस्तीने शित पे प्यायला दिले. यावेळी त्यांनी मुलीच्या नकळत शीत पेयात गुंगीचे औषध टाकले होते. पीडितेची शुद्ध हरपल्यावर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी पीडित मुलीचा व्हिडीओ देखील बनवला व तिला या प्रकरणी कुणाला काही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले. दरम्यान, पीडितेने हा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.