अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यामधील चान्नी फाटाजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. अकोल्यातील निर्गुणा नदीच्या अरुंद पुलावरून दोन्ही वाहनं समोरासमोर आल्यानंतर हा अपघात झाला. नदीवरील पूल अरुंद असल्यामुळे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कारवर पलटली. यामुळे कार ट्रकखाली दबली व पुलाच्या रेलिंगवर अडकली. कारमधील चार जण अडकले.
तांदूळ वाहून नेत असलेल्या ट्रकने कारला धडक दिली व पलटला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. पण, कारमधील चारही प्रवासी जखमी झाले असून कार व ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. ट्रकमधील तांदळीची पोती पुलावर पसरली होती. आज (शनिवार) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कार ट्रकखाली दबली गेल्याने कारमधील प्रवासी आतमध्ये अडकले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले.
चान्नी फाट्यावरील निर्गुणा नदीच्या पुलावरून दोन्ही वाहनं जात असताना, हा भीषण अपघात झाला. नदीवरील पूल छोटा असल्यामुळे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कारवर पलटी झाला. अरुंद रस्त्यावरुन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् शेजारुन जात असलेल्या कारवर हा तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कारवर कोसळला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कार (एम एस ४६ बी क्यू ०५८३) वाडेगावकडून पातुरकडे जात होती. तर ट्रक (क्रमांक जी.जे ३६ व्ही ५४८०) पुलावर समोरासमोर आल्यानंतर दोन्ही वाहनांची धडक झाली. कार चालक शेख अमीर शेख जाकीर तसेच रशीद शहा जाफर शहा जखमी झाले असून त्यांना वाडेगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल केले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. लोकांनी कारमध्ये अडकलेल्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. चान्नी फाट्यावरील अरुंद पुलावरच ट्रक कोसळल्याने ट्रकमधील तांदुळाची पोती पुलाखाली पडली होती.
निर्गुणा नदीच्या पुलावर ट्रक जागेवरच पलटी झाला तर कार पुलावर लटकली होती. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक फरार झाला. अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे फुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहनांना जेसीबीच्या मदतीनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
संबंधित बातम्या