Akola Accident : भरधाव कारने PSI ला उडवलं; जागीच मृत्यू, अकोला जिल्ह्यातील घटनेने खळबळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Akola Accident : भरधाव कारने PSI ला उडवलं; जागीच मृत्यू, अकोला जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Akola Accident : भरधाव कारने PSI ला उडवलं; जागीच मृत्यू, अकोला जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Jul 28, 2024 12:22 AM IST

Akola News : अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) भरधाव कारनं उडवलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

भरधाव कारने PSI ला उडवलं
भरधाव कारने PSI ला उडवलं

राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे, नागपूर, नाशिक व मुंबईनंतर आता अकोल्यातही अशी घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) भरधाव कारनं उडवलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

राजेंद्र मोरे असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून ते अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजु पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. उपनिरीक्षक मोरे ड्युटी संपवून बोरगाववरून मूर्तिजापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने त्यांना उडवले. बोरगाव मंजू ते कुरणखेडच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.

पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं असून अपघातग्रस्त चारचाकीही ताब्यात घेतली आहे. मोरे दुचाकीवरून जात असल्याना कारने त्यांना उडवले. 

कारच्या धडकेत मोरे रस्त्यावर आपटले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार अकोल्यातीलच असून  नागपूरवरून अकोल्याकडे येत होती. 

राजेंद्र मोरे अकोला येथे कुटूंबासह रहात होते व आपल्या दुचाकीने दररोज अकोल्यातून बोरगावला येत होते. त्यांना दोन लहान मुले असून त्यांच्या आकस्मिक मृत्यूने ती मुले पोरकी झाली आहेत. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलीनं आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यानं बापानं जवायला संपवलं -

मुलीने बालपणीच्या मित्रासोबत आंतर जातीय विवाह केल्याने संतापलेल्या बापाने जावयाची भर रस्त्यात चाकूने भोसकून हत्या केली. अमित मुरलीधर साळुंके असे हत्या झालेल्या जावयाचे नाव आहे. तर वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही अशी आरोपींची नावे आहेत. घटनेनंतर दोघेही आरोपी फरार झाले आहेत. ही घटना १४ जुलै रोजी शहरातील इंदिरानगरमध्ये घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेला जावई याची १२ दिवसांच्या मृत्यूशी झुंज देतांना शुक्रवारी प्राणज्योत मालवली. दोघांनी घरच्यांचा विरोध झुगारून देऊन एप्रिल महिन्यात त्यांनी पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर मुलाच्या घरचा विरोध मावळला. मात्र मुलीच्या घरच्यांना हा विवाह पसंत नव्हता. अखेर यात तरुणाला जीव गमवावा लागला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर