मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 03, 2024 04:37 PM IST

Kiran Sarnaik Brothers Car Accident: आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला अपघात झाल्याची घटना उघडकीस आली.

अकोल्यातील पातुर शहराजवळ झालेल्या कार अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
अकोल्यातील पातुर शहराजवळ झालेल्या कार अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.

Akola Patur Car Accident: अकोल्यातील पातुर शहराजवळ आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अपघातग्रस्त कारमधून सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करीत होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील पुलाजवळ आज दुपारी किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला अपघात झाला. कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सरनाई यांचा भाऊ, मुलगी आणि नातीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पातुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

रघुवीर अरुण सरनाईक (वय, २८), शिवाणी अजिंक्य आमले (वय,३०), स्मिरा अजिंक्य आमले (वय, १ वर्ष), पियुष भगवान देशमुख (वय, १०), सपना भगवान देशमुख (वय, ३५), सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय, ३१) आणि श्रेयस इंगळे (वय, ३) अशी मृतांची नावे आहेत.

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

यवतमाळ: ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक; दोघांचा मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

यवतमाळ जिल्ह्यातील उमरी सायखेडा येथे आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलरचा यांच्या धडकेत दोन जणांचा मृ्त्यू झाला. तर, तीन जखमी झाल्याची माहिती समोर आली. याशिवाय, ७० शेळ्या ठार झाल्या. जखमींना उपचारासाठी अर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच स्थानिकांच्या मदतीने आयशर ट्रकमधील जखमी बकऱ्यांना बाहेर काढले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. हा अपघात नेमका कशामुळे घडला? याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

IPL_Entry_Point

विभाग