पुण्यातील गोखले संस्थेचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा अखेर राजीनामा; सांगितलं व्यक्तिगत कारण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील गोखले संस्थेचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा अखेर राजीनामा; सांगितलं व्यक्तिगत कारण

पुण्यातील गोखले संस्थेचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा अखेर राजीनामा; सांगितलं व्यक्तिगत कारण

Nov 04, 2024 01:05 PM IST

Ajit Ranade resigns as VC of Gokhale institute : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (जीआयपीई) कुलगुरूपदाचा राजीनामा दिला आहे.

पुण्यातील गोखले संस्थेचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा अखेर राजीनामा; सांगितलं व्यक्तिगत कारण
पुण्यातील गोखले संस्थेचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा अखेर राजीनामा; सांगितलं व्यक्तिगत कारण

Ajit Ranade resigns as VC of Gokhale institute : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (जीआयपीई) कुलगुरूपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या गुलगुरू पदासाठीच्या पात्र-अपात्रतेचा मुद्दा काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला होता. हा वाद न्यायालयात देखील गेला होता. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियाही पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिक कारण देत डॉ. अजित रानडे यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी गोखले संस्थेचे कुलपती डॉ. संजीव सन्याल यांना राजीनामा सुपूर्द केला आहे.

अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांनी नियुक्ती शिक्षक आणि इतर शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी किमान पात्रता पूर्ण केली नव्हती. यावरून मोठा गदारोळ झाला होता. यानंतर त्यांच्या कागद पत्रांची व पात्रतेची तपासणी करण्यासाठी सत्यशोधक समिती स्थापना करण्यात आली होती. या समितीने सादर केलेले सर्व पुरावे पाहून तत्कालीन कुलपती विवेक देबरॉय यांनी १४ सप्टेंबर रोजी रानडे यांना पदावरून हटवले होते. या निर्णया विरोधात डॉ. रानडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने डॉ. देबराय यांच्या निर्णयाला स्थगिती देत डॉ. रानडे यांना दिलासा दिला होता. त्यानंतर डॉ. देबराय यांनी कुलपती पदाचा राजीनामा दिला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. संजीव सन्याल यांची कुलपतीपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी डॉ. रानडे यांच्यावरील कारवाईचे पत्र मागे घेत असल्याचे न्यायालयाला कळवले. २२ ऑक्टोबर रोजी जीआयपीईचे नवनियुक्त कुलपती संजीव सन्याल यांनी रानडे यांना कुलगुरूपदावरून हटविण्याचा आदेश मागे घेत त्यांना या पदावर कायम ठेवले होते. रानडे यांनी २९ ऑक्टोबर रोजी सान्याल यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणास्तव आपण जीआयपीईच्या कुलगुरूपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटले आहे.

डॉ. अजित रानडे यांनी डॉ. सन्याल यांना राजीनाम्याचे पत्र सादर केले आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशातील सर्वांत चांगल्या संस्थांपैकी एक असलेल्या गोखले संस्थेचे अडीच वर्षांसाठी नेतृत्त्व करण्याची संधी दिल्याबद्दल रानडे यांनी व्यवस्थापन मंडळ, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी, प्राध्यापक आणि कर्मचारी, विद्यार्थी व अन्य सर्वांचे आभार मानले आहे. तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तसेच माझा राजीनामा संस्थेच्या कुलगुरूपदी २०२१ मध्ये झालेल्या माझ्या नेमणुकीसाठी कोणत्याही पद्धतीने त्रुटी किंवा अपात्रता दर्शवत नाही, असे देखील त्यांनी राजीनाम्यात लिहिले आहे.

मोठी बातमी! राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने दिले आदेश

एसआयएसने १९३० मध्ये स्थापन केलेली जीआयपीई ही देशातील अर्थशास्त्रातील सर्वात जुनी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे. भारतीय समाजाच्या सामाजिक-आर्थिक पैलूंवरील संशोधनासाठी समर्पित आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचा वारसा पुढे नेणारी ही संस्था आहे, असे संस्थेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर