महाराष्ट्र निवडणूक निकालापूर्वी पोस्टर वॉर, पुण्यात झळकले अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्र निवडणूक निकालापूर्वी पोस्टर वॉर, पुण्यात झळकले अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर

महाराष्ट्र निवडणूक निकालापूर्वी पोस्टर वॉर, पुण्यात झळकले अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर

Nov 23, 2024 07:11 AM IST

Pune politics : मतमोजणीपूर्वी पुण्यात एका पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून दाखवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते संतोष नांगरे यांनी हे पोस्टर लावले आहे.

Ajit Pawar will be the CM of Maharashtra? Poster as future Chief Minister was put up even before the results
Ajit Pawar will be the CM of Maharashtra? Poster as future Chief Minister was put up even before the results

Pune politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अद्याप लागलेला नाही. मात्र, त्यापूर्वीच मुख्यमंत्री म्हणून नेत्यांचे  पोस्टर्स झळकू लागले आहेत. पुण्यात  मतमोजणीपूर्वी पोस्टरवॉर रंगले आहे. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हे पोस्टर काढून टाकण्यात आले.  या पोस्टरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून दाखवण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते संतोष नांगरे यांनी हे पोस्टर लावले होते. पण, पोस्टरवरून मोठा वाद झाल्यानंतर ते  हटवण्यात आले. 

महाराष्ट्रात  मुख्य लढत भाजपप्रणित महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची आघाडी महायुती आहे, तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाविकास आघाडीचा भाग आहेत.

निवडणूक निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलनुसार महायुती पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. पी-मार्क एक्झिट पोलमध्ये महायुतीला १३७  ते १५७ तर महाविकास आघाडीला १२६  ते १४७  जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर पक्षांना २ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. चाणक्य रणनीतीनुसार महायुतीला १५०  ते १५२ तर महाविकास आघाडीला १३० ते १३८  जागा मिळण्याची शक्यता आहे.

निवडणूक निकालानंतर महायुतीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील, असे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी कधीही स्पर्धा झाली नाही. आम्हाला सरकार स्थापन करायचे आहे आणि पुढील पाच वर्षांत आणखी विकासकामे करायची आहेत. महाविकास आघाडीने आपल्या कार्यकाळात केवळ मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावर चर्चा केली, तर कोणताही ठोस संदेश जनतेपर्यंत पोहोचला नाही. निवडणुकीचा निकाल आज  २३ नोव्हेंबरला लागणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत सत्तेचे समीकरण कोणाच्या बाजूने जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपप्रणित महायुतीला बहुमताची आशा आहे, तर महाविकास आघाडी दमदार कामगिरीचा दावा करत आहे.

Whats_app_banner