मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : 'आमच्याकडे कुणीही आले नाही, २०१४ ला काय झाले ते तुम्हीच बघा'; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Ajit Pawar : 'आमच्याकडे कुणीही आले नाही, २०१४ ला काय झाले ते तुम्हीच बघा'; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 30, 2022 03:03 PM IST

Ajit Pawar pune tour : विरोधीपक्षनेते अजित पवार यांचा आज पुणे दौरा होता. यावेळी त्यांनी त्यांच्या शैलीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Ajit Pawar, Leader of Opposition (Photo by Bhushan Koyande/HT Photo)
Ajit Pawar, Leader of Opposition (Photo by Bhushan Koyande/HT Photo) (HT PHOTO)

पुणे : राज्यात विविध मुद्यांवरून सध्या कलगीतुरा रंगलेला आहे. कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी    भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासह सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असा गौप्यस्फोट केला होता. यावर आज अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबद्दल स्पष्ट व्यक्तव्य केले आहे. पवार म्हणाले, २०१४ला आमच्याकडे कोणी आले नाही. २०१४ ला काय झालं ते बघा. सध्या जुन्या गोष्टी उकरून काढण्याची जणू स्पर्धा लागली आहे. त्या एवजी राज्यातील लाखो जॉब महाराष्ट्राबाहेर गेले त्याबद्दल बोलले पाहिजे असे देखील पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेते अजित पावर आज हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी ते मध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, या जुन्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा राज्यातील लाखो रोजगार हे राज्यबाहेर गेले त्याबद्दल बोलायला हवे. प्रसारमाध्यमांनी देखील अशा गोष्टींना प्रसिद्धी देऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले. हे जे झाले ते २०१४ ला झाले असेल, इतक्या जुन्या गोष्टी लक्षात राहत नाहीत असे देखील पवार म्हणाले.

पीएफआय संदर्भात प्रश्न विचारल्यास पवार म्हणाले, पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार नुकताच एका आंदोलनवेळी घडला आहे . त्यानंतर याप्रकरणात पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ही अटक झाली. केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर पाच वर्षाची बंदी घातली आहे. पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्या घटनेचा तपास लवकरात लवकर करावा. महाराष्ट्रात आणि देशात कुठेही पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देता कामा नये, अशा आरोपींवर लवकर कारवाई झाली पाहिजे. हा तपास लांबवण्यात काही कारण नाही असे देखील पावर म्हणाले.

ते छगन भुजबळांचे वैयक्तिक मत...

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भूजबळ यांनी 'फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? असं वक्तव्य केलं होतं. त्यावर अजित पवार म्हणाले, छगन भुजबळ यांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे असे पक्षाने आधीच सांगितलं आहे. प्रत्येकाला स्वत:ची भूमिका मांडण्याच अधिकार आहे. पण पक्षाने ती भूमिका घेतलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

असल्या फालतू टीकांना मी उत्तर देत नाही..

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण मुंडकं खाणारा डायनासॉर होता.अशी टीका अब्दुल सत्तार यांनी अजित पवार यांच्यावर केली. त्यावर अजित पवार म्हणाले, आपण असल्या फालतू टीकांना मी महत्व देत नाही, अशा शब्दांत सत्तांराची टीकेचा समाचार त्यांनी घेतला.

फी लागणार की मोफत ट्रेनिंग देणार; अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना लिहिणार पत्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांचे पालकमंत्री पद मिळाल्यावर अजित पवार यांनी त्यांचावर टीका केली होती. या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत अजित पवार यांना जर ट्रेनिंग हवे असल्यास ते मी देईन अशी असे उत्तर दिले होते. फडणवीस यांच्या या उत्तराला अजित पवार यांनी देखील उत्तर दिले. पवार म्हणाले, मी फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे, की तुमच्याकडे प्रशिक्षणाला कधी येऊ, त्यासाठी फी लागणार आहे की मोफत ट्रेनिंग देणार आहे असे देखील त्यांनी सांगावे, असे पवार म्हणाले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग