मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजित पवारांनी गुरं-ढोरं पाळावी, शेती करावी… आता राजकारण सोडावं

अजित पवारांनी गुरं-ढोरं पाळावी, शेती करावी… आता राजकारण सोडावं

Jun 06, 2024 11:20 PM IST

अजित पवार यांनी आता राजकारण सोडून गुरं ढोरं पाळावी, शेती करावी असा सल्ला सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी दिला आहे.

अजित पवारांनी शेती करावीः उत्तम जानकर
अजित पवारांनी शेती करावीः उत्तम जानकर

लोकसभा निवडणुकीत राज्यात लढवलेल्या एकूण दहापैकी आठ जागा जिंकून दमदार कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे नेते आता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीए. सोलापूर जिल्ह्यात माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे धैर्यशिल मोहिती पाटील यांचा १ लाख २० हजार ८३७ मतांनी दणदणीत यश मिळाले. या मतदारसंघात शरद पवारांनी खास लक्ष घालून विविध जात-धर्माच्या नेत्यांची नीट मोट बांधली होती. या मतदारसंघात धनगर समाजाची मोठी संख्या आहे. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांना भाजपने आपल्याकडे खेचण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. परंतु सोलापूर मतदारसंघातून भाजपने तिकीट नाकारल्यामुळे नाराज असलेले जानकर भाजपकडे गेले नाही. ‘अजित दादांनी गद्दारी केली. शरद पवार हे भर उन्हामध्ये ४४-४५ अंश सेल्सिअस तापमानात १२-१२ तास राबत होते. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यामध्ये अश्रु येत होते. हे सगळं बघून सर्वसामान्य मतदार पेटून उठला. अजित पवारांना मात्र याचं वाईट वाटलं नाही' अशी टीका जानकर यांनी केली आहे. माढ्यात धैर्यशिल मोहिते पाटील यांना जरी १ लाख २० हजार ८३७ मते मिळाली असली तरी वास्तवात आमचा विजय ३ लाख मताने झालेला आहे. पिपाणी चिन्हाला ५८,४२१ मतं गेली. शिवाय भाजपने मतदारसंघात धनशक्तीचा प्रचंड वापर केला. पैशाच्या माध्यमातू एक लाख मतं त्यांनी नेेली आहेत. अशाप्रकारे तीन लाखाच्या फरकाने आमचा विजय झालेला आहे.' असं जानकर म्हणाले. पैशाचा वापर आणि निवडणूक आयोगाने जाणूनबूजून दिलेल्या चुकीच्या चिन्हामुळे गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं जानकर म्हणाले. फलटन, मान मतदारसंघामध्ये पैशाच्या जोरावर आघाडी घेतली. परंतु आम्ही माढा, करमाळा आणि माळशिरसमध्ये मेहनत करून लिड घेतला असल्याचे जानकर म्हणाले.  

ट्रेंडिंग न्यूज

अजित पवारांनी जेलवारी करायला हवी होती!

अजित पवारांना मी तीन वेळा जाऊन भेटलो होतो. शरद पवारांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे, असं मी त्यांना बोललो होतो. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १०० आमदार निवडून आणायचे होते, असं मी म्हणालो होतो, असं जानकर म्हणाले. अनिल देशमुख, संजय राऊत यांनी जेलमध्ये जाणे पसंत केले. अजित पवारांना जास्तीत जास्त सहा महिन्याची जेलची शिक्षा झाली असती. परंतु शरद पवारांच्या संघर्षामध्ये त्यांनी त्यांच्यासोबत उभं राहणं गरजेचं होतं, असं जानकर म्हणाले. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून मोहिते पाटील यांच्या घराण्याला आणि मला हद्दपार करण्याचा भाजपचा डाव होता. भाजपवाल्यांनी सत्तेच्या धुंदीत आम्हाला मोजलंच नाही. मोहिता पाटील आणि मी एकत्रित, एकदिलाने प्रचार केला. आम्ही दोघांनी एकत्रित येऊन भाजपचा डाव हाणून पाडला. मला आमदार करण्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी शब्द दिला असल्याचे जानकर म्हणाले. केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आली असली तरीही दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ सरकार राहणार नसल्याचं जानकर म्हणाले.

भाजप नेत्यांनी विशेष विमान पाठवून अनेक प्रलोभने दिली होती. ३५ कोटी रुपयाची ऑफर दिली होती, असंही जानकर म्हणाले. आज राज्यात भाजप सुपडासाफ करण्यासाठी फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचं जानकर म्हणाले.

टी-२० वर्ल्डकप २०२४