तो आवाज सुप्रियाचाच! मी चांगला ओळखतो; बिटकॉइन घोटाळ्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तो आवाज सुप्रियाचाच! मी चांगला ओळखतो; बिटकॉइन घोटाळ्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

तो आवाज सुप्रियाचाच! मी चांगला ओळखतो; बिटकॉइन घोटाळ्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Nov 20, 2024 12:06 PM IST

Ajit Pawar on Bitcoin Scam : अजित पवार यांनी राज्यातील बीटकॉईन घोटाळ्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज हा सुप्रिया सुळे यांचा असल्याच दावा त्यांनी केला आहे.

'तो आवाज सुप्रियाचाच; मी चांगला ओळखतो; दोषी आढळल्यास कारवाई करणार'; बिटकॉइन घोटाळ्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
'तो आवाज सुप्रियाचाच; मी चांगला ओळखतो; दोषी आढळल्यास कारवाई करणार'; बिटकॉइन घोटाळ्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया (ANI)

Ajit Pawar on Bitcoin Scam : महाराष्ट्रात मतदानापूर्वी भाजपने बिटकॉइन घोटाळा पुढे आणला. या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून ज्यात सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आवाज असल्याचा दावा करण्यात आला आहे. बिटकॉइन घोटाळ्यात हे नेते सामील असून त्यातून मिळणारी कमाई निवडणूक प्रचारात वापरली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, या प्रकारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडले आहे. ऑडिओ क्लिपमध्ये असलेला आवाज हा सुप्रिया सुळे यांचाच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुप्रिया माझी बहीण असून मी तिचा आवाज ओळखतो असे पवार म्हणाले. अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथे मतदान केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी उत्तर दिले.

पवार म्हणाले, बीटकॉईन घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी. या प्रकरणी संपूर्ण सत्य लोकांसमोर यायला हवे. पवार म्हणाले, या लोकसभे प्रमाणे या निवडणुकीत देखील माझ्या समोर लढणारे बारामतीतील माझे कुटुंबीय आहे. त्यामुळे ही लढाई अवघड आहे. ऑडिओ क्लिपबाबत अजित पवार म्हणाले की, 'क्लिपमध्ये जे काही आहे, ते मला माहित आहे. मी या लोकांसोबत काम केलं आहे. त्यातली एक माझी बहीण आहे. मी त्यांचा आवाज ओळखतो ज्यांच्याबरोबर मी दीर्घकाळ काम केले आहे. या संदर्भात चौकशी करून योग्य पुराव्याच्या आधारे कारवाई केली जाईल, असे पवार म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार यांचं महत्वाचं व्यक्तव्य

अजित पवार यांनी काटेवाडी येथे मतदान केल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबाद व्यक्तव्य केलं. अजित पवार म्हणाले, राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही सर्व निवडून आलेले आमदार व नेते एकत्र बसून चर्चा करू. या चर्चेतून मुख्यमंत्र्याची निवड करू.

महाराष्ट्रात मतदानापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मंगळवारी भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे विरारमधील एका हॉटेलमध्ये रोख रक्कम घेऊन वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तब्बल ५ कोटी रुपये वाटतांना त्यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडले होते. तर दुसरे प्रकरण म्हणजे बीटकॉईन घोटाला. यात खासदार सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी फसवणुक केल्याचा आरोप निवृत्त वरिष्ठ आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. हे प्रकरण २०१८ चे असून क्रिप्टोकरन्सीद्वारे पेमेंट करण्यात आले होते.

ही रक्कम आता निवडणुकीत खर्च केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी भाजपने पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले. यावर सुप्रिया सुळे यांनी भाजपला आव्हान दिले आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनामी करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी भाजप वर केला आहे. भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे आणि पटोले या बीटकॉईन घोटाळ्यात गुंतले असून या पैशांचा वापर निवडणूक निकालावर प्रभाव पाडण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला होता.

Whats_app_banner