अयोध्येतील भव्य दिव्य अशा राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी उद्घाटन होत आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून अनेक व्हीव्हीआयपी लोकांना तसेच साधू-संताना सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ते २२ जानेवारीला अयोध्येला जाण्याची शक्यता आहे.
राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी महाराष्ट्रातून एकूण ८८९ जणांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जवळपास ३५५ साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदार आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे व काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी हे राम मंदिर सोहळ्यात उपस्थित राहणार नाहीत. हा संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळं पक्षानं हा निर्णय घेतल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या संदर्भात निवेदन प्रसिद्ध करत म्हटलं आहे.
संबंधित बातम्या